Kalyan MNS News Saam Digital
मुंबई/पुणे

Kalyan MNS News: मराठी पाट्या लावा अन्यथा..., कल्याणमध्ये मनसे आक्रमक, 27 फेब्रुवारीपर्यंत अल्टिमेटम

Kalyan MNS News: कल्याणमधील बहुतांश दुकानांवर अद्यापही मराठी पाट्या दिसत आहेत. त्यामुळे अशा दुकानांवर मराठी भाषा दिन म्हणजेच 27 फेब्रुवारी पर्यंत कारवाई करण्याची मागणी मनसे कार्यकर्त्यांनी केली आहे.

Sandeep Gawade

Kalyan MNS News

मराठी पाट्यासंदर्भात कल्याण डोंबिवलीमधील मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज माजी आमदार व शहर अध्यक्ष प्रकाश भोईर, जिल्हाप्रमुख उल्हास भोईर ,महिला शहराध्यक्ष कस्तुरी देसाई यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने महापालिका आणि कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांची भेट घेतली.

कल्याणमधील बहुतांश दुकानांवर अद्यापही मराठी पाट्या नसल्याचे निदर्शनास आणून देत कारवाई कधी करणार असा सवाल केला. मराठी भाषा दिन म्हणजेच 27 फेब्रुवारी पर्यंत कारवाई झाली नाही तर तोडफोड करण्याची सुरुवात तुमच्या कार्यालयापासून करू त्यानंतर दुकाने फोडू असा इशारा मनसेने कामगार आयुक्त कार्यलयातील अधिकाऱ्यांना दिला आहे.

न्यायालयाच्या आदेशानंतरही कल्याण शहरात बहुतांश दुकानांवर इंग्रजी पाट्या झळकत आहेत. मराठी पाट्यांबाबतची कारवाई करण्याचे अधिकार कामगार आयुक्त कार्यालयाकडे असल्याने महापालिका हतबलता दर्शवतेय. तर कल्याण कामगार आयुक्त कार्यालयाकडे मनुष्यबळ कमी असल्याची सबब दिली जातेय . दरम्यान मराठी पाट्यांसंदर्भात मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून गेलं अनेक महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे. मात्र त्यानंतरही मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवर कारवाई झालेली नाही.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठी पाट्यांसंदर्भात आता मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज मनसेचे माजी आमदार व शहर प्रमुख प्रकाश भोईर, जिल्हाप्रमुख उल्हास भोईर, महिला शहराध्यक्ष कस्तुरी देसाई यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांनी कामगार आयुक्तालयात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी मराठी पाट्या नसलेल्या दुकानांवर मराठी भाषा दिनापर्यंत म्हणजेच 27 तारखेपर्यंत कारनाई करावी. त्यानंतर जर इंग्रजी पाट्या लावलेल्या दिसल्या आणि दुकानदारांवर कारवाई झाली नाही तर तोडफोड करण्याची सुरुवात तुमच्या कार्यल्यापासून करू त्यानंतर दुकाने फोडू असा इशारा यावेळी मनसेच्या नेत्यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भेंडी खाल्ल्याने कोणते व्हिटॅमीन्स शरीराला मिळतात?

Maharashtra Rain Live News : नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

Maharashtra Politics: शरद पवारांना आणखी एक धक्का, माजी आमदाराने सोडली साथ; अजित पवारांच्या पक्षात जाणार

11th admission deadline : अकरावी प्रवेशासाठी मुदतवाढ, या तारखेपर्यंत घेता येणार प्रवेश

Shocking News : भयानक घटना! ५ वर्षांच्या मुलावर भटक्या कुत्र्याचा हल्ला, मानेचे लचके तोडले

SCROLL FOR NEXT