कल्याण: अवकाळी पावसामुळे वीट भट्ट्यांचे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान... प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

कल्याण: अवकाळी पावसामुळे वीट भट्ट्यांचे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान...

बुधवारी सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने वीटभट्टी उद्योगवर संकट कोसळले.

प्रदीप भणगे

कल्याण: कल्याण ग्रामीण भागात मातीपासून विटांची निर्मिती केली जात असते. मात्र बुधवारी सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने वीटभट्टी (brick kiln) उद्योगवर संकट कोसळले. तसेच अवकाळी पावसामुळे शेतीचेही नुकसान झाले. (Kalyan: Massive damage to brick kilns and agriculture due to untimely rains)

हे देखील पहा -

कल्याण ग्रामीण भागाला काल अवकाळी पावसाने (untimely rains) झोडपून काढले आहे. यात शेतकऱ्यांचे आणि वीटभट्टी चालकांचे मोठे नुकसान झाले आहे. वीट निर्मितीसाठी इतर जिल्ह्यातून मजूर वर्ग हा मोठ्या प्रमाणात या ग्रामीण भागात येतो आणि काम करतो. मात्र अवकाळी पावसाने त्याच्या केलेल्या मेहनतीवर पाणी फिरवले आहे. वीट भट्टीचे नुकसान झालेच आणि वीटांचे पण झाले. कामगाराच्या झोपड्यांमधील साहित्य सुद्धा भिजून गेले, तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

वीटभट्टी चालक हे सध्या आपल्या मजुरांना अन्न-निवाऱ्याची व्यवस्था करत आहेत. अनेक वीटभट्टी चालकांनी मजुरांना झोपडीवर टाकण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्या उपलब्ध करून दिल्या आहेत. कल्याण ग्रामीण भागातील शिरढोण, वडवली, कोळे, वसार, खरड, कुशिवली, करवले, कुंभार्ली आदी परिसरात वीटभट्टी उद्योग हे सर्वाधिक सुरु आहेत. त्यामुळे वीटभट्टी चालक जरी मजुरांची व्यवस्था करत असेल तरी त्यांचे हाल मात्र सर्वाधिक होत असल्याचे दिसून येत आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला

Ganesh Visarjan 2025: आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच 'गणेश' गिरणा पात्रात बुडाला, गणेश विसर्जनावेळी राज्यभरातील ५ ठिकाणी विपरित घडलं, १० जण बुडाले

Dhananjay Munde : पोलिसांना आडनाव लावता येत नसेल तर....; आमदार धनंजय मुंडे यांच्याकडून समाजातील समतेवर प्रश्नचिन्ह

Shocking: स्पाय कॅमेरा अन् ७४ तरुणींचे प्रायव्हेट व्हिडीओ; विमानातील पायलटचं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT