"आहे तिथूनच बाबासाहेबांना मानवंदना देऊयात" बाळासाहेबांच भीमसैनिकांना आवाहन...

बाळासाहेब आंबेडकर यांनी आंबेडकरी अनुयायांना यंदाच्या वर्षी चैत्यभूमी, दादर येथे न येता आहे तिथूनच बाबासाहेबांना मानवंदना द्यावी असं आवाहन केलं आहे.
"आहे तिथूनच बाबासाहेबांना मानवंदना देऊयात" बाळासाहेबांच भीमसैनिकांना आवाहन...
"आहे तिथूनच बाबासाहेबांना मानवंदना देऊयात" बाळासाहेबांच भीमसैनिकांना आवाहन...Saam Tv
Published On

मुंबई: ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनी मुंबईला यावं की नाही अशी विचारणा केली आंबेडकरी जनतेकडून केली जात आहे. अशातच बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) यांनी आंबेडकरी अनुयायांना यंदाच्या वर्षी चैत्यभूमी (Chaitya Bhoomi), दादर (Dadar) येथे न येता आहे तिथूनच बाबासाहेबांना मानवंदना द्यावी असं आवाहन केलं आहे.

हे देखील पहा -

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी मुंबईला यावं की नाही अशी विचारणा केली जात आहे. सध्या रेल्वे पूर्णपणे चालू झालेली नाही, एसटीचाही संप सुरू आहे. सोबतच कोरोनाच्या नव्या व्हेरियंट (Omicron Variant) बद्दल अंदाज कोणालाही येत नाहीये. अशा परिस्थितीत आपण येणं टाळावं असं माझं आवाहन आहे. आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणाहून बाबासाहेबांना मानवंदना देण्याचं काम करूया. सोबतच आंबेडकरवादी राजकीय पक्षालाच आम्ही तारण्याचं काम करू आणि आंबेडकरी पक्षाच्या उमेद्वारालाच मतदान करु हा संकल्प सगळ्यांनी करूया. जयभीम! (Jay Bhim)

"आहे तिथूनच बाबासाहेबांना मानवंदना देऊयात" बाळासाहेबांच भीमसैनिकांना आवाहन...
Mumbai : ओमायक्रॉनचं भान ठेऊनच.. महापरिनिर्वाण दिनी दर्शन; महापौरांच स्पष्टीकरण

दरम्यान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (kishori Pednekar) यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, यावर्षी आंबेडकरी अनुयायी बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी चैत्यभूमीला येऊ शकतात, पण कोरोनाचे सर्व नियम पाळले जावेत. याशिवाय मुंबईजवळील अनुयायांनी नंतर दर्शन घ्यावं, अगोदर दूरच्या अनुयायांना दर्शन घेऊन द्यावं असं आवाहनही त्यांनी केलं.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com