Kalyan Viral Video  Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan News: कल्याणमधील मराठी तरुणीच्या मारहाणीचा संपूर्ण VIDEO, आरोपी आधी आक्षेपार्ह बोलला, नंतर लाथ मारली

Kalyan Viral Video: कल्याणमध्ये मराठी तरुणीला परप्रांतीय तरुणाने मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडीओ समोर आला होता. पण तरुणीची चूक असल्याचा आरोप आरोपीच्या आईने केला होता. त्यानंतर या घटनेचा पूर्ण व्हिडीओ समोर आला आहे. नेमकं काय घडलं पाहा...

Priya More

कल्याणमध्ये मराठी तरुणीला परप्रांतीय तरुणीला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मारहाणीत तरुणीला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी गोकुळ झा या तरुणाला अटक केली आहे. या घटनेमध्ये फक्त माझ्या मुलाचाच नाही तर तरुणीचा देखील दोष आहे. तिने माझ्या सुनेला मारले त्यानंतर ही घटना घडली असल्याचा आरोप आरोपी मुलाच्या आईने केला होता. तसंच तिने व्हिडीओ अर्धवट दाखवल्याचा देखील आरोप केल होता. आता या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये नेमकं काय घडलं होतं हे स्पष्टपणे दिसून येत आहे.

पीडित तरुणी कल्याणमधील एका रुग्णालयामध्ये काम करते. मारहाणीची घटना घडली त्यावेळी आरोपी आपल्या भावाच्या आजारी बाळाला घेऊन आला होता. त्याच्यासोबत त्याची आई आणि वहिनी देखील होती. गर्दी असल्यामुळे तरुणीने त्याला काही पेशंटचे नंबर आहेत त्यामुळे थांबायला सांगितले. तरी देखील तरुणाने आणि त्याच्या आईने आम्हाला आधी जायचे असल्याचे सांगून तरुणीसोबत वाद घातला.

तरुणाने डॉक्टरांच्या केबिनमध्ये डायरेक्ट जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. तर तरुणाने तरुणीला शिवीगाळ केली आणि तिच्या अंगावर धावून गेला. त्याने तिला लाथ मारली. पण तरुणाच्या आईने त्याला अडवून बाहेर काढले. पण चिडलेल्या तरुणीने आरोपीच्या वहिनीवर हात उचलला. तर बाहेर गेलेल्या तरुणाने रुग्णालयात येत थेट तरुणीच्या पोटावर लाथ मारली. त्यानंतर त्याने या तरुणीचे केस ओढून तिला जमिनीवर आपटत मारहाण केली.

ही संपूर्ण घटना आरोपी गोकुळच्या आईच्या डोळ्यासमोर घडली तरी देखील तिने आपल्या मुलाच्या चुकीवर पांघरून टाकण्याचा प्रयत्न केला. तिने सांगितले की, त्या तरुणीने माझ्या मुलाला आधी मारले. दोन्ही बाजू दाखवणे गरजेचे आहे. सीसीटीव्ही फुटेज कट करून दाखवण्यात आले. पूर्ण सीसीटीव्ही दाखवा. त्या तरुणीने माझ्या सुनेला शिवीगाळ केली त्यामुळे माझ्या मुलाने तिला मारहाण केली आहे. मात्र ही मारहाण करणं योग्य नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Director Death : हरहुन्नरी कलाकार हरपला; प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, टिव्ही इंडस्ट्रीवर शोककळा

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरात सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू

लग्नासाठी १४ कोटींचा पॅलेस बुक; होणाऱ्या पत्नीच्या वाढदिवशी ट्रेकिंगला गेलेल्या बिल्डरच्या मुलाचा मृत्यू, लोहगडावर नेमकं काय झालं?

PM Kisan Yojana : शेतकऱ्याच्या खात्यावर किती वाजता जमा होणार ₹२०००? पीएम किसान योजनेची महत्त्वाची अपडेट आली समोर

पुण्यात रक्तरंजित थरार; नराधमाने 'लिव्ह-इन पार्टनर'च्या ३ वर्षीय मुलाला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT