KALYAN KALA TALAV CASE: 17-YEAR-OLD GIRL FOUND DEAD, 32 CCTV CAMERAS DEFUNCT DURING POLICE PROBE Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan : कल्याण हादरलं! काळा तलावात सापडला १७ वर्षीय मुलीचा मृतदेह; पोलिसांनी ३२ कॅमेरे चेक केले अन्...

Kalyan Crime News : कल्याण पश्चिम येथील काळा तलावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. पोलिस हत्या की आत्महत्या या दोन्ही शक्यतांवर तपास करत आहे.

Alisha Khedekar

  • कल्याणच्या काळा तलावात १७ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

  • मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली

  • पोलिस तपासादरम्यान परिसरातील ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे समोर

  • हत्या की आत्महत्या याबाबत अद्याप स्पष्टता नाही

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

Kalyan Crime: कल्याण पश्चिम येथील काळा तलाव परिसरात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा तलावात मृतदेह तरंगताना दिसला आणि परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला असता अनेक धागे दोरे समोर आले असून ही नेमकी हत्या आहे की आत्महत्या हे अद्यापही समोर आलेलं नाही. दरम्यान याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस गेले असता परिसरातील तब्बल ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे आढळल्याने पालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगी संचिता ही सोमवारी अचानक घरातून गायब झाली. तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोधाशोध केला. मात्र ती सापडली नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कुटुंबियांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी घटनेची गांभीर्यता लक्षात घेऊन तपास सुरु केला. तपासादरम्यान मंगळवारी सकाळी ४ वाजण्याच्या सुमारास कल्याण येथील काला तलावात एका मुलीचा मृतदेह तरंगताना आढळला. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली असता तो मृतदेह बेपत्ता असलेल्या संचिताचा असल्याचे समोर आले.

याप्रकरणी पोलिसांनी नेमकं काय घडलं? याचा आढावा घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही चेक करण्यात आले. मात्र ३२ कॅमेरे काही दिवसांपासून बंद असल्याचे आढळले. याशिवाय घटना घडली त्या वेळी सुरक्षा रक्षक नेमके कुठे होते, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. परिसरातील रस्त्यावरील लाईट्स देखील बंद असल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर महापौर हर्षाली चौधरी यांनी महापौर कार्यालयात स्मार्ट सिटी आणि वीज विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली. बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले. "कोट्यवधी रुपये खर्च करूनही नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळत नसेल, तर त्या खर्चाचा उपयोग काय?" असा थेट सवाल महापौरांनी उपस्थित केला. तसेच सुरक्षा यंत्रणेत झालेल्या त्रुटी तातडीने दूर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. दरम्यान याघटनेनंतर पोलिसांनी तपास सुरु केला असला तरी संचिताची हत्या झाली की तिने स्वतः आयुष्य संपण्याचं टोकाचं पाऊल उचललं हे शोधणं आता पोलिसांसमोर मोठं आवाहन आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गुरुपौर्णिमेनिमित्ताने गुरुकडून शिष्यांना वृक्ष भेट देत, वृक्ष संवर्धनाचा संदेश

सर्वात मोठी बातमी! परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, आता राज्यसभेत 'परीक्षा'

Manoj Jarange : फडणवीसांनी मराठ्यांच्या लेकरांनाच टार्गेट का केलं? जरांगेंचा थेट हल्लाबोल

ICC Ranking : आयसीसी रँकिंगमध्ये मोठा उलटफेर; वनडेमध्ये शुभमन गिल, टी २० मध्ये वैभव सूर्यवंशीची जबरदस्त झेप

Crime: लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, आधी गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला

SCROLL FOR NEXT