Kalyan Dombivli News Saam Tv
मुंबई/पुणे

Gold Necklace News : घरातल्या कचऱ्यासोबत सोन्याचा हारही फेकला, सफाई कर्मचाऱ्यांनी दाखवली तत्परता, नेमकं काय घडलं?

Kalyan Dombivli News : कल्याणमध्ये कचऱ्याच्या पिशवीमध्ये कचऱ्यासोबत चुकून सोन्याचा हार गेला. मात्र केडीएमसी आणि सुमित कंपनीच्या सफाई कर्मचाऱ्यांनी प्रमाणिकपणे महिलेला तिचे दागिने परत मिळवून दिले.

Alisha Khedekar

कल्याण पूर्वेत महिलेने कचऱ्यासोबत सोन्याचा हार कचऱ्यात टाकला

केडीएमसी आणि सुमित कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दाखवली तत्परता

कचऱ्यातून शोधून हार परत दिल्याने सर्वत्र कौतुक

केडीएमसी आणि सुमित कंपनीच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाने जिंकली सर्वांची मने

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

सोन्याच्या किंमती एकीकडे दिवसागणिक नवनविन उच्चांक गाठत असताना दुसरीकडे कचऱ्याच्या पिशवीमध्ये कचऱ्यासोबत चुकून सोन्याचा हारही टाकून दिल्याचा प्रकार कल्याण पूर्वेत समोर आला आहे. मात्र केडीएमसी आणि सुमित कंपनीच्या सफाई कामगारांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे महिलेला तिचे दागिने परत मिळाले आहे. त्यामुळे सर्वच स्तरांतून कर्मचाऱ्यांचे मोठे कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केडीएमसीच्या सुमित कंपनीच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून नेहमीप्रमाणे सकाळी कल्याण पूर्वेच्या विविध भागातून कचरा संकलनाचे काम सुरू होते. कल्याण पूर्वेतील इमारती आणि चाळीच्या परिसरातून गोळा झालेला हा सर्व कचरा कचोरे टेकडीवरील इंटरकटींग केंद्रावर पाठवण्यात येत होता. त्याचदरम्यान सकाळी कचरा घेण्यासाठी आलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना कचरा देताना त्यामध्ये नजरचुकीने एका महिलेकडून सोन्याचा हारही टाकला गेल्याची तक्रार सुमित कंपनीचे 4 जे प्रभागाचे अधिकारी समीर खाडे यांना केडीएमसीचे स्वच्छता निरीक्षक अमित भालेराव यांच्याकडून प्राप्त झाली.

त्यावरून ही तक्रार आलेल्या ठिकाणी कचरा संकलन करण्यासाठी गेलेल्या संबंधित सफाई कर्मचाऱ्यांना समीर खाडे यांनी या सोन्याच्या हाराबाबत माहिती दिली. आणि त्यांनी लगेचच कचरा संकलन केलेली ही गाडी कचोरे टेकडीवरील इंटरकटींग केंद्रावर नेण्याच्या सूचना गाडीचालकाला केली. तसेच हार गहाळ झालेल्या महिलेलाही या इंटरकटिंग पॉइंटवर बोलवण्यात आले. त्यावेळी या गाडीमध्ये गोळा करण्यात आलेला कचरा संबंधित महिला आणि तिच्या कुटुंबीयांसह शेजाऱ्यांच्या आणि सुमित कंपनीच्या अधिकाऱ्यांसमक्ष वेगळा करण्यात आला.

महिला व तिच्या घरच्यांनी यात स्वतः कचऱ्यात हाराचा शोध घेतला आणि त्यामध्ये या महिलेकडून चुकून कचऱ्यात आलेल्या हार मिळून आला. तो महिलेच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती सुमित कंपनीच्या समीर खाडे यांनी दिली. केडीएमसी व सुमित कंपनीच्या सफाई कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परता आणि प्रामाणिकपणानामूळे हे शक्य झाले. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात राजकीय उलथापालथ; पाहा VIDEO

पुण्यातील IT पार्क हिंजवडीत भीषण अपघात, ट्रकची दुचाकीला धडक, तरूणी थेट चाकाखाली चिरडली

Beed Politics : बीडमधील ६ नगरपरिषदेच्या निवडणुकीतील चित्र स्पष्ट; कुठे असेल महायुती कुठे बिघाडी?

Maharashtra Live News Update: अकलूजमध्ये तिरंगी लढत; मोहिते पाटीलविरुध्द भाजप सामना

बीडमध्ये भाऊ -बहिणीची प्रतिष्ठा पणाला? संध्या देशमुखांच्या एन्ट्रीमुळे राजकीय तापमान वाढलं|VIDEO

SCROLL FOR NEXT