Mumbai: अखेर 'त्या' शिवसेनेच्या माजी नगरसेवकासह इतरांवर गुन्हा दाखल प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

Mumbai: अखेर 'त्या' शिवसेनेच्या माजी नगरसेवकासह इतरांवर गुन्हा दाखल

मोकाशी पाड्यातील माजी पोलीस पाटील एकनाथ मोकाशी आणि त्यांचा मुलाला प्रशांत मोकाशी याला बेदम मारहाण करण्यात आली

प्रदीप भणगे

मुंबई: कल्याण ग्रामीण (Rural) विधानसभा (Assembly) क्षेत्रातील मोकाशी पाडा, दहीसर आणि दहिसर मोरी या ३ गावांमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांची २८५ एकर शेती (Agriculture) आहे. या शेतीवर विकास प्रकल्प राबवले जाणार आहेत. या महत्वाच्या जागेवर सर्व बिल्डरांचा डोळा आहे. मागच्या गुरुवारी रात्रीच्या ८: १५ वाजेच्या सुमारास ४ ते ५ गाड्यातून काही जण लाठ्याकाठ्या घेऊन आले होते. मोकाशी पाड्यातील माजी पोलीस (Police) पाटील एकनाथ मोकाशी आणि त्यांचा मुलाला प्रशांत मोकाशी याला बेदम मारहाण (Beating) करण्यात आली आहे. (kalyan former shiv sena corporator ramesh mhatre been booked farmer assault case)

हे देखील पहा-

इतकेच नव्हे तर महिलांना देखील धक्काबुक्की करण्यात आली आहे. यामध्ये एकनाथ मोकाशी यांना डोक्याला आणि पायाला मार लागला आहे, तर प्रशांत मोकाशी याला डोक्याला आणि सम्पर्ण अंगाला मार लागला आहे. याबाबत मेडिकलची प्रकिया पूर्ण करून सुद्धा पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला नाही, आणि त्यानंतर देखील २ दिवस उलटूनही गुन्हा दाखल केला नाही. शेतकरी कुटुंबाला न्याय मिळावा आणि मारहाण करण्याऱ्यावर गुन्हा दाखल व्हावा, यासाठी मनसे आमदार प्रयत्न करत होते.

परंतु ,अखेर ५ दिवसानंतर शीळ- डायघर पोलिसाना गुन्हा दाखल करावा लागला आहे. दरम्यान डोंबिवली मधील शिवसेना माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, सचिन पाटील, वैभव पाटील यांच्यासह १५ जणांविरोधात कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२६, ५०४, ५०६ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार राजू पाटील यांनी शेतकरी एकनाथ मोकाशीसह पोलीस ठाण्यात भेट दिली आणि पोलिसांचे आभार मानत पोलिसांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आमदार पाटील यांनी यावेळी केली आहे.

Edited by- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT