Arunachal Pradesh: दुर्दैवी घटना! अरुणाचलमध्ये हिमस्खलनात भारतीय लष्कराचे ७ जवान शहीद; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

अरुणाचल प्रदेशात कामेंग सेक्टरमध्ये हिमस्खलनात अडकून बेपत्ता झालेले भारतीय ७ जवान शहीद झाले
Arunachal Pradesh: दुर्दैवी घटना! अरुणाचलमध्ये हिमस्खलनात भारतीय लष्कराचे ७ जवान शहीद; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
Arunachal Pradesh: दुर्दैवी घटना! अरुणाचलमध्ये हिमस्खलनात भारतीय लष्कराचे ७ जवान शहीद; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोकSaam Tv
Published On

वृत्तसंस्था: अरुणाचल प्रदेशात (Arunachal Pradesh) कामेंग सेक्टरमध्ये (Kameng Sector) हिमस्खलनात अडकून बेपत्ता झालेले भारतीय ७ जवान शहीद झाले आहेत. मंगळवारी ही माहिती देत असताना भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार की, अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) पश्चिम कामेंग जिल्ह्यात भारत (India)-चीन (China) सीमेवर हिमस्खलनामुळे बेपत्ता झालेल्या ७ जवानांचे मृतदेह सापडले आहेत. ६ फेब्रुवारी दिवशी कामेंग सेक्टरमधील उच्च उंचीच्या भागात हिमस्खलनात भारतीय लष्कराचे (army) ७ जवान अडकले होते. (7 Indian Army personnel killed avalanche Arunachal)

हे देखील पहा-

अडकलेल्या जवानांना शोधण्याकरिता त्याच दिवसापासून शोध आणि बचाव कार्य सुरू होते. भारतीय लष्कराने (Indian Army) आता त्या सर्व जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. लष्कराला त्या सर्व जवानांचे मृतदेह सापडले आहेत. या भागात हवामान मागील काही दिवसांपासून खराब आहे आणि येथे जोरदार बर्फवृष्टी होत आहे.

लष्कराने दिलेल्या माहितीनुसार की, शोध आणि बचाव कार्य आता संपले असून हिमस्खलनाच्या ठिकाणाहून ७ जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार की, हा भाग १४ हजार ५०० फूट उंचीवर आहे. मागील अनेक दिवसांपासून या भागात मुसळधार बर्फवृष्टीबरोबरच खराब हवामानाच्या बातम्या येत आहेत. वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून या भागात मुसळधार हिमवृष्टीसह खराब हवामान आहे. (7 Indian Army personnel killed avalanche Arunachal)

Arunachal Pradesh: दुर्दैवी घटना! अरुणाचलमध्ये हिमस्खलनात भारतीय लष्कराचे ७ जवान शहीद; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
Hingoli: आता हद्द झाली! वाळू माफियांनी अंगावर ट्रॅक्टर घातल्याचा आव आणणारा महसूल अधिकारी निघाला लाचखोर

अरुणाचल प्रदेशामधील हिमस्खलनात मृतांमध्ये हवालदार जुगल किशोर, आरएफएन अरुण कट्टल, आरएफएन अक्षय पठानिया, आरएफएन विशाल शर्मा, आरएफएन राकेश सिंग, आरएफएन अंकेश भारद्वाज आणि जीएनआर गुरबाज सिंग यांचा समावेश आहे. या सर्व जवानांच्या सर्वोच्च बलिदानाला भारतीय लष्कराने यावेळी आदरांजली वाहिली आहे.

दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी ट्विट करून सांगितले आहे की, अरुणाचल प्रदेशात हिमस्खलनामुळे भारतीय लष्कराच्या जवानांच्या मृत्यूने दुःख झाले आहे. देशाच्या उत्कृष्ट सेवेकरिता त्यांनी दिलेले हे योगदान आम्ही कधी देखील विसरणार नाही. मी शोकग्रस्त कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त करतो. राष्ट्रपती राम नाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि त्यांच्या कुटुंबीयाबरोबर अनेक नेत्यांनी अरुणाचल प्रदेशात हिमस्खलनात मृत्युमुखी पडलेल्या ७ जवानांच्या मृत्यूविषयी शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांनी ट्विट करून सांगितले आहे की, अरुणाचल प्रदेशात हिमस्खलनामुळे झालेल्या अपघातामध्ये जवानांच्या मृत्यूचे दुःख शब्दात वर्णन करता येणार नाही. देशाच्या सेवेत शूर जवानांनी बलिदान दिले आहे. त्यांचे निस्वार्थ बलिदान सदैव स्मरणात राहणार आहे. माझ्या भावना त्यांच्या कुटुंबियाबरोबर आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com