Kalyan News X
मुंबई/पुणे

Kalyan News : खासगी शाळेतील संचालकाचा अश्लील व्हिडीओ व्हायरल; पालकांचा संताप, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Kalyan News In Marathi : कल्याणमधील एका खासगी शाळेतील संचालकाचा व्हिडीओ व्हायरल झाला. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी नाराजी व्यक्त केली. संतप्त पालकांनी पोलीस ठाणे गाठले.

Yash Shirke

अभिजित देशमुख, साम टीव्ही, प्रतिनिधी

कल्याण पूर्वेकडील एका नामांकित खासगी शाळेतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेच्या संचालकाचा एक अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त केला आहे. पालकांना पोलीस ठाण्यात संचालकाविरोधात तक्रार केली आहे.

शाळेच्या कार्यालयातील संचालकाचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पालकांनी एकत्र येत कोलशेवाडी पोलीस ठाणे गाठले आणि संबंधित संचालकाविरोधात तक्रार अर्ज दाखल केला. त्यानंतर चौकशी सुरु केली. याबाबत शाळेचे संचालक सदस्य महेश गायकवाड यांनी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करावा, मी देखील अनेकदा तक्रारी केल्या आहेत, असे म्हटले.

शाळा हे शिक्षण आणि संस्कारांचे ठिकाण असते. अशा ठिकाणी अश्लीलता समोर येणे हे अतिशय लाजीरवाणे असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली. या संपूर्ण प्रकरणावरुन ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आशा रसाळ यांनी शाळा प्रशासनाविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. शिक्षण मंडळाकडेही तक्रार करुन कारवाईची मागणी करु असे आशा रसाळ म्हणाल्या. या प्रकरणी कोलशेवाडी पोलिसांनी चौकशी करुन कारवाई करण्यात येईल असे सांगितले.

कल्याण पूर्वेमधील एका खासगी शाळेच्या संचालकाचा अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओ प्रकरणावरुन शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक संतप्त झाले आहेत. पालकांनी कोळशेवाडी पोलीस ठाणे गाठत संचालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर, प्रतिबंधित गुटखा-पानमसाला विक्रेत्यांना दणका; २ दिवसांत 32 आरोपी अटकेत

लग्न समारंभ आटोपून नवविवाहित जोडपं हेलिकॉप्टरनं निघालं अन् क्षणार्धात कोसळलं; नवरदेवाचा मृत्यू

डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी! पिंपळेश्वर मंदिरभूमीसाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर

Ladki Bahin Yojana: तब्बल1,25,00,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र, नवी आकडेवारी आली समोर

विरोधी पक्षातील २ आमदार तडकाफडकी निलंबित; अचानक नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT