Kalyan Traffic Saam TV
मुंबई/पुणे

Kalyan Traffic : कल्याण पोलिसांचा वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोठा निर्णय; नवरात्रौत्सव काळात जड वाहनांना बंदी

Kalyan Durgadi Fort : कल्याण शहरात २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत नवरात्रौत्सव काळात जड व अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. दुर्गाडी किल्ल्यावर देवी दर्शनासाठी होणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पोलिसांचा हा निर्णय.

Alisha Khedekar

  • कल्याण शहरात नवरात्रौत्सव काळात जड वाहनांवर बंदी लागू

  • २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान पोलिसांची कडक अंमलबजावणी

  • दुर्गाडी देवी दर्शनासाठी लाखो भाविकांच्या गर्दीचा विचार करून निर्णय

  • वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ट्रक, कंटेनर इत्यादी वाहनांना प्रवेशबंदी

वाहतूक कोंडीने त्रासलेल्या कल्याणकर नागरिकांना येणाऱ्या नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी तात्पुरता दिलासा दिला आहे. कल्याणात येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीला वाहतूक पोलिसांकडून बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भात वाहतूक पोलीस उपआयुक्त पंकज शिरसाट यांनी अधिसूचना जारी करत ही माहिती दिली आहे.

त्यानुसार येणाऱ्या सोमवारपासून म्हणजेच 22 सप्टेंबर 2025 पासून जड अवजड वाहनांना कल्याण शहरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली असून 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत हा निर्णय लागू राहणार आहे. येत्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रौत्सव काळामध्ये दुर्गाडी किल्ल्यावरील देवीच्या मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात.

परिणामी दुर्गाडी चौकातून गोविंदवाडी बायपास मार्गे पत्रीपुलाकडे जाणारा मार्ग बंद ठेवण्यात येतो. ज्याचा ताण लालचौकी - सहजानंद चौक - छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गावर येतो आणि कल्याणच्या या प्रमुख मार्गावर मोठी मोठ्या वाहन संख्येमुळे संपूर्ण पश्चिम शहराला वाहतूक कोंडीचा फटका बसतो.

गणेशोत्सव काळामध्ये झालेल्या वाहतूक कोंडीच्या यातना लाखो लोकांनी भोगल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी घेतलेला हा मोठ्या वाहनांच्या बंदीचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. किमान नवरात्रोत्सव काळात तरी नागरिकांना वाहतूक कोंडीमध्ये अडकावे लागणार नाही अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : न्या. सुर्यकांत यांनी घेतली सरन्यायाधीश पदाची शपथ

Tejas Fighter Jet Crash: दुबईमधील शोमध्ये घातपात? एअर शोदरम्यान भारतीय बनावटीचं तेजस MK1 कोसळलं कसं?

Masti 4 vs 120 Bahadur vs De De Pyaar De 2 : रितेश, अजय, फरहान रविवारी कोणाचा चित्रपट हाऊसफुल? '120 बहादूर' ठरतोय वरचढ

Pakistan Blast: पाकिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला, सैनिकांच्या मुख्यालयाजवळ २ बॉम्बस्फोट अन् गोळीबार; पाहा VIDEO

Cotton buds in ears: कॉटन बड्सने कान टोकारताय? आताच थांबा, अन्यथा बहिरे व्हाल, वाचा डॉक्टरांनी काय सांगितलं

SCROLL FOR NEXT