Kalyan News Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan : कल्याणमध्ये कायदा सुव्यवस्था धाब्यावर; नशखोरांची घरात घुसून दुकानदार दाम्पत्याला मारहाण

Kalyan Crime News : कल्याणच्या आडिवली ढोकळी परिसरात नशेखोरांनी दुकानदार आणि त्यांच्या पत्नीवर हल्ला करत वाहनांची तोडफोड केली. सीसीटीव्हीत संपूर्ण प्रकार कैद झाला असून नागरिकांनी पोलिस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.

Alisha Khedekar

  • आडिवली ढोकळीत नशेखोरांची दहशत वाढत चाललेली आहे

  • दुकानदार आणि पत्नीवर घरात घुसून मारहाण

  • सीसीटीव्हीमध्ये तोडफोडीचे दृश्य कैद

  • पोलिस गस्त वाढवण्याची आणि कारवाईची नागरिकांची मागणी

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याणच्या आडिवली ढोकळी परिसर पुन्हा एकदा नशेखोरांच्या त्रासामुळे दहशतीत आला आहे. गणेश चौक परिसरात एका दुकानदार आणि त्याच्या पत्नीला मारहाण करत काही नशेखोरांनी गाड्यांची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना रविवारी उशिरा घडली. संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला असून नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही नशेत असलेल्या तरुणांनी परिसरात बेहिशेबी वर्तन करत प्रथम रस्त्यावर उभ्या वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर गणेश चौकातील किराणा दुकानाजवळ गोंधळ घालत दुकानदार आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केली. अचानक घडलेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेनंतर नागरिक मोठ्या प्रमाणावर एकत्र आले असून, रोजच्या वाढत्या नशेखोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांचे बीट लवकरात लवकर वाढवण्याची मागणी त्यांनी केली आहे. रात्रीच्या वेळी पोलिस गस्त पुरेशी नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. यावर महिला नागरिकानी सांगितले की, इथे दररोज नशेखोरांचा त्रास वाढला आहे.

मुलांना, महिलांना सुरक्षितता राहिलेली नाही. कालची घटना तर भयंकर होती. दुकानदारांच्या घरात घुसून मारहाण केली. आम्ही पोलिसांना वारंवार सांगत आहोत, पण गस्त वाढवली नाही तर मोठी दुर्घटना घडू शकते. दरम्यान, सीसीटीव्हीत कैद झालेल्या फुटेजच्या आधारे पोलिस पुढील तपास करत असल्याची माहिती मिळाली आहे. नागरिकांमध्ये मात्र भीतीचे सावट कायम असून तातडीने कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिहारमध्ये मोठी दुर्घटना! गंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

महायुतीत समन्वयाचा 'दुष्काळ', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज?

Fact Check: ऑनलाईन शॉपिंग महागणार? ऑनलाईन शॉपिंगवर 5% GST?

नवी मुंबई महापालिकेत मतदार राहतात, वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर 27 मतदारांची नोंद

IMD Alert: महाराष्ट्रासह 17 राज्यात धो-धो बरसणार वरूणराजा; 60 ताशी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

SCROLL FOR NEXT