Kalyan Dombivli municipal Corporation Saam tv
मुंबई/पुणे

उमेदवारांचा बिनविरोध विजय वादात, सामाजिक कार्यकर्ते कोर्टात जाणार? भाजप-शिंदे गटाचं टेन्शन वाढलं

Kalyan Dombivli municipal Corporation : कल्याण-डोंबिवलीत उमेदवारांचा बिनविरोध विजय वादात सापडला आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे.

Vishal Gangurde

कल्याण-डोंबिवलीत महायुतीचे काही उमेदवार बिनविरोध विजयी घोषित

सामाजिक कार्यकर्त्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

सामाजिक कार्यकर्त्यांच्या इशाऱ्याने महायुतीची डोकेदुखी वाढली

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

महायुतीचे २० उमेदवार बिनविरोध विजयी घोषित करण्यात आलेत. मात्र नोटा पर्याय नाकारल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्यांनी महापालिका आणि राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. तर सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर, यासंदर्भात हायकोर्टात पिटीशन दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे. घाणेकर यांच्या म्हणण्यानुसार हे तर सिलेक्शन आहे इलेक्शन नाही.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून मतदान आणि मतमोजणी आधीच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीचे २० उमेदवार विरोधात कोणताही उमेदवार नसल्याने या उमेदवारांचा बिनविरोध विजय झाल्याचं भाजप आणि शिवसेनेच्या अधिकृत नेत्यांनी घोषित केले. त्याचप्रमाणे बिनविरोध निवडून आल्याचं सांगत उमेदवारांनी देखील आपल्या मतदारसंघात विजय रॅली काढत जल्लोष साजरा केला.

या विजयानंतर प्रशासनात संभ्रम निर्माण झाला आहे, कारण नोटा पर्यायही ईव्हीएम मशीनवर उमेदवार म्हणून उपलब्ध आहे. मात्र पहिल्यांदाच पॅनल पद्धतीमध्ये अशा प्रकारची घटना घडल्याने त्या ठिकाणी ईव्हीएम मशीन एका उमेदवारासाठी लावायची की नाही यासंदर्भात प्रशासन संभ्रमामध्ये आहे.

प्रशासनाच्या या संभ्रमामुळे आता सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर, आक्रमक झाले असून राज्य निवडणूक आयुक्त, संबंधित निवडणूक अधिकारी आणि केडीएमसी आयुक्त विरोधात न्यायालयात जाणार असल्याची तयारी सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपकडून गायिका अंजली भारती यांच्यावर कारवाईची मागणी

Union Budget 2026-27 : यंदाचा अर्थसंकल्प ऐतिहासिक, पहिल्यांदाच...; लाइव्ह अपडेट्स कधी आणि कुठे बघाल?

महायुतीने निकालाआधी उधळला गुलाल; कोकणात तब्बल २५ उमेदवार बिनविरोध

Mayor Election: महापौर निवड कधी होणार? संभाव्य तारखा आल्या समोर; मुंबई, पुण्याचा कधी ठरणार?

Fruits Benefits: सतत अपचनाचा त्रास होतो? मग रोज 'हे' फळं खल्ल्याने सगळे त्रास होतील दूर

SCROLL FOR NEXT