CM Eknath Shinde Shinde Devendra Fadnavis Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: महायुतीत फोडाफोडी बंद, पण 'ठणाठणी' सुरूच; कल्याण-डोंबिवलीतलं राजकारण पुन्हा तापलं

CM Eknath Shinde Shinde Devendra Fadnavis: महायुतीमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा वादाची ठिणगी उडाली. कल्याण डोंबिवली निवडणुकीवरून शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुखाने पुनः भाजपला डीवचले.

Priya More

Summary -

  • कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत पुन्हा तणाव निर्माण झाला

  • पॅनल २ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचा अरविंद मोरे यांचा ठाम दावा

  • भाजपने केलेल्या दाव्यावर शिवसेनेने थेट विरोध दर्शवला

  • कल्याण-डोंबिवली महापालिकेत दोन्ही पक्षांतील तणाव वाढला

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याण -डोंबिवली महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील तणाव पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. कल्याण डोंबिवली निवडणुकीवरून शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुखाने पुनः भाजपला डीवचले. 'याठिकाणी महायुतीचे वातावरण असूनही पॅनल क्रमांक २ हा शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला आहे. इथे भाजपला एकही जागा मिळणे शक्य नाही.', असा थेट इशाराच शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी भाजपला दिला आहे.

शहरातील वाढत्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर अरविंद मोरे यांनी महापालिका निवडणुका आणि जागावाटपावर भूमिका स्पष्ट करताना भाजपच्या दाव्यावर सवाल उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, 'पॅनल २ मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेची पकड मजबूत आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी केलेले काम आणि मतदारांचा विश्वास या पॅनलला आजही सुरक्षित ठेवतो. युती झाली तरी बालेकिल्ल्यावर तडजोड नाही.'

दरम्यान, या विधानामुळे महायुतीतील अंतर्गत समीकरणांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवसेना नेत्याच्या या वक्तव्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील तणाव अद्याप संपला नसल्याचे दिसत आहे. यामुळे दोन्ही पक्षातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. भाजप स्थानिक नेतृत्वाकडून अद्याप याबाबत अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नसली तरी पॅनल २ संदर्भातील शिवसेनेची ठाम भूमिका पाहता दोन्ही पक्षांमध्ये तणाव आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? शिंदेंसेनेचे 22 आमदार फुटणार?

Winter Hair Care Tips: रात्री झोपण्यापूर्वी केस विंचरल्याने काय फायदा होतो? वाचा

बिबट्यामुळे बळी, मिळणार सरकारी नोकरी?हल्ल्यात बळी पडलेल्यांना सरकारचा दिलासा?

Dried Dates Benefits: हिवाळ्यात खारीक खाण्याने होतील 'हे' हेल्दी फायदे

Winter Almond Milk Benefits: थंडीत बदाम दूध पिण्याचे चमत्कारिक फायदे

SCROLL FOR NEXT