Maharashtra Political News Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात आणखी एक राजकीय भूकंप; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा समर्थकांसह राजीनामा

Maharashtra Political News : राज्याच्या राजकारणात आणखी एक राजकीय भूकंप आला आहे. काँग्रेसच्या बड्या नेत्याचा समर्थकांसह सामूहिक राजीनामे दिले आहेत.

Vishal Gangurde

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांचा समर्थकांसह राजीनामा

जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या राजीनाम्याने उलटसुलट चर्चांना उधाण

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही आठवड्यांपासून शहरात अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यामध्ये आता आणखी एका घडामोडीची भर पडली आहे. काँग्रेसच्या विद्यमान जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्यासह त्यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे दिले आहेत. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार आपण हे राजीनामे दिल्याचे जिल्हाध्यक्ष पोटे यांनी सांगितले असले तरी या राजीनाम्यांनंतर उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

आपल्या पदांचे हे राजीनामे देण्यामागे कोणतेही इतर राजकीय कारण नसून पक्षातील नव्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संधी मिळावी या उद्देशाने आपण राजीनामा देत असून हा नाराजीनामा नसल्याचे सचिन पोटे यांनी स्पष्ट केले. तर आमचे नेते राहुल गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वरिष्ठ नेते संजय दत्त यांच्या मार्गदर्शनानुसार यापुढेही आपली वाटचाल सुरूच राहील. तसेच इतक्या वर्षांपासून आपण काँग्रेस पक्ष आणि त्याच्या विचारधारेशी एकनिष्ठ आहोत.

यापुढेही आपली ही पक्षनिष्ठा कायम राहील असेही त्यांनी सांगितले. तर इतक्या कमी काळामध्ये काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी आपल्यावर विश्वास दाखवत दिलेल्या विविध जबाबदाऱ्यांबाबत आपण त्यांचे नेहमीच ऋणी राहू असेही त्यांनी स्पष्ट केले. तर आपल्याला अनेक पक्षांकडून ऑफर आल्या असल्या तरी आपण कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

सचिन पोटे - जिल्हाध्यक्ष

लिओ मॅकेनराय - उपाध्यक्ष

विमल ठक्कर - ब्लॉक अध्यक्ष

शकील खान - ब्लॉक अध्यक्ष

प्रविण साळवी - ब्लॉक अध्यक्ष

मनिषा सर्जिने - ब्लॉक अध्यक्ष, कल्याण पूर्व

अशोक कापडणे - ब्लॉक अध्यक्ष

सचिन भटेवरा - ब्लॉक अध्यक्ष

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT