कधी बॅनर तर कधी पत्रकार परिषदा; कल्याण-डोंबिवलीत राजकारण तापलं... SaamTvNews
मुंबई/पुणे

कधी बॅनर तर कधी पत्रकार परिषदा; कल्याण-डोंबिवलीत राजकारण तापलं...

प्रदीप भणगे

डोंबिवली : भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री एकनाथ शिंदे डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर डोंबिवलीत भाजपने पालकमंत्री एकनाथ शिंदे डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी अशा आशयाचे बॅनर लावले होते. हे बॅनर नंतर उतरवण्यात आले. भाजपकडून सुरू असलेल्या या आरोपांना आज शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले आहे. जो निधी मंजूर झाला नाही, तो रद्द कसा होईल. जे टीका करतायत त्यांच्याकडे दाखवण्यासाठी काही उरल नाही, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले.

हे देखील पहा :

तर भाजप - शिवसेनेच्या राजकारणात उडी टाकत दोन्ही पक्षांवर मनसेने टीका केली आहे. मनसेचे डोंबिवली शहरअध्यक्ष मनोज घरत यांनी सांगितले की २०१४ पासून हे सुरू आहे. टॉम आणि जेरी चा खेळ आहे. लोकांची फसवणूक करायची, एकमेकांवर चिखलफेक करायची ह्यांनी एवढी वर्ष मांडीला मांडी लावून सत्ता उपभोगली आहे तेच आता एकमेकांवर चिखलफेक करत आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कल्याण डोंबिवली मधील राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून येतंय. शिवसेना भाजप नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची एक ही संधी सोडत नाहीत असं एकूणच दिसून येतंय. भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेत डोंबिवलीतील विकासकामे शिवसेनेमुळे रखडल्याचा आरोप केला होता. यावेळी एमएमआरडीएच्या (MMRDA) माध्यमातून डोंबिवलीतील काँक्रिट रस्त्यांची कामे रद्द करण्याचा स्पष्ट आदेश देणारे दुसरे तिसरे कोणी नसून खुद्द पालकमंत्री एकनाथ शिंदेच आहेत. तसेच शिंदे हेच डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी असल्याचा खबळजनक आरोप चव्हाण यांनी केला होता.

त्यानंतर डोंबिवलीत पालकमंत्री एकनाथ शिंदेच डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी या आशयाचे बॅनर भाजपच्या वतीने लावण्यात आले. अवघ्या काही तासातच महापालिकेने हे बॅनर उतरवले. दरम्यान, आज शिवसेनेचे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, युवा सेना कल्याण जिल्हा अधिकारी दीपेश म्हात्रे, माजी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि इतर पदाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेत भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. यावेळी आमदार चव्हाण यांनी केलेल्या आरोपांचा दीपेश म्हात्रे यांनी निषेध व्यक्त केला.

यावेळी दीपेश म्हात्रे यांनी सांगितले की, पालकमंत्री एकनाथ शिंदे हे कल्याण-डोंबिवलीचे तारणहार आहेत. त्यांनी कल्याण-डोंबिवली साठी 1900 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. म्हात्रे यांनी पुढे बोलताना सांगितले की, जे टीका करतायत त्यांच्याकडे दाखवण्यासाठी काही उरले नाही म्हणून आपले आपलं अपयश लपवण्यासाठी टीका करत आहेत. यंदाच्या निवडणुकीत जनता त्यांना जागा दाखवेल असा टोलाही आमदार चव्हाण यांना लगावला. फक्त डीपीआर मंजूर झाला पुढील कोणतीही कारवाई झाली नाही. चव्हाण ह्यांना निवडणुकीच्या तोंडावर उशिरा आलेली जाग असून त्यांनी समोर येऊन पुरावे दाखवावेत. जो निधी मंजूर झाला नाही तो रद्द कसा होईल असा सवाल म्हात्रे यांनी केला. जे दाखवतील ते लोकांनी पाहावं अशी भाजपची सवय असल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला.

दरम्यान, या सर्व घटनेनंतर मनसेने दोन्ही पक्षांवर टीका केली आहे. मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी सांगितले की २०१४ पासून हेच राजकारण सुरू आहे. शिवसेना आणि भाजपचा हा टॉम आणि जेरी चा खेळ आहे. लोकांची फसवणूक करायची, एकमेकांवर चिखलफेक करायची. एवढी वर्ष या दोन्ही पक्षांनी मांडीला मांडी लावून सत्ता उपभोगली आहे. २५ वर्ष कल्याण डोंबिवली महानगर पालिकेमध्ये हे सत्ताधीश होते. आता यांना निवडणुकीच्या तोंडावरती एकमेकांवर कुरघोड्या करायच्या आहेत आणि चर्चेत राहायचे आहे. डोंबिवलीकर जनता सुज्ञ आहे यंदा यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court : सुप्रीम कोर्टाचं अधिकृत युट्यूब चॅनेल हॅक !

How To Book IRCTC Tatkal Ticket: रेल्वेचं तात्काळ तिकीट कसं बुक करायचं? वाचा ही संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Maharashtra News Live Updates: संजय राऊतांनी सांभाळून बोलावं : बच्चू कडू

Explainer : लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

SCROLL FOR NEXT