Kalyan Dombivli Municipal Corporation Election 2025 2026 Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan Dombivli : केडीएमसी निवडणुकीत भाजपचा दुसरा विजय निश्चित! कार्यकर्त्यांचा जल्लोष

Kalyan Dombivli Municipal Corporation Election 2025 2026 : कल्याण – डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या आधीच भाजपच्या दोन उमेदवारांचे बिनविरोध विजय निश्चित झाले आहे. रेखा राजन चौधरी आणि आसावरी नवरे विजय निश्चित.

Alisha Khedekar

  • कल्याण – डोंबिवली महापालिकेच्या २९ जागांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार

  • भाजपच्या रेखा राजन चौधरी (प्रभाग 18A) आणि आसावरी नवरे (प्रभाग 26क) यांचा बिनविरोध विजय होण्याची शक्यता

  • विरोधकांनी अर्ज न केल्यामुळे दोघांची बिनविरोध निवड

  • भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

संघर्ष गांगुर्डे, कल्याण - डोंबिवली

येत्या पंधरा जानेवारी रोजी राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बरोबर घेऊन महापालिकेंवर युतीची सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वस्व पणाला लावले आहे. दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेचा बाल्लेकिला असलेल्या कल्याण - डोंबिवलीत निवडणुकीआधीच भाजपने आपलं दुसऱ्यांदा खातं उघडलं आहे. प्रभाग क्रमांक १८ अ मध्ये भाजपच्या रेखा राजन चौधरी आणि डोंबिवली पूर्वेतील प्रभाग क्रमांक २६ (क) मध्ये भाजपच्या आसावरी नवरे यांचा बिनविरोध विजय होण्याची दाट शक्यता निर्माण करण्यात आली आहे.

कल्याण प्रभाग क्रमांक १८ अ मध्ये काल म्हणजेच ३० डिसेंबर रोजी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या जागेसाठी भाजपच्या रेखा राजन चौधरी यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, दुसरा कोणीही अर्ज दाखल केला नाही. त्यामुळं निकालाआधीच त्या विजयी ठरल्या असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे डोंबिवली पूर्वेतील प्रभाग क्रमांक २६ (क) मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आसावरी नवरे यांनी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांच्या विरोधात कोणत्याही राजकीय पक्षाकडून अथवा अपक्ष उमेदवाराकडून अर्ज दाखल न झाल्याने निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

निवडणूक अधिकाऱ्यांकडे आलेल्या माहितीनुसार, सदर प्रवर्गातून एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे नियमानुसार आसावरी नवरे यांची निवड बिनविरोध जाहीर होणार आहे. अधिकृत घोषणेसाठी निवडणूक विभागाकडून अंतिम प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

या घडामोडीमुळे डोंबिवलीत भाजपाला दुसरा बिनविरोध विजय मिळण्याची शक्यता असून, स्थानिक राजकीय वर्तुळात या निकालाची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, पक्षाची संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे बोलले जात आहे.

या विजयानंतर दोन्हीही विजयी उमेदवारांनी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचे सहर्ष अभिनंदन करत नगरसेवक पदाच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी आदरणीय मुख्यमंत्री आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनीही फोन द्वारे दोघींचे अभिनंदन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dudhi Kofta Recipe : सोप्या पद्धतीने बनवा टेस्टी अन् मसालेदार दुधी कोफ्ता, नोट करा रेसिपी

Maharashtra Live News Update: देशात सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांपैकी पुण्याचा दुसरा क्रमांक

SBI Recruitment: स्टेट बँकेत नोकरीची संधी; मिळणार ८० लाखांचे पॅकेज; अर्ज करण्याची शेवटची तारीख काय? वाचा सविस्तर

Border 2: सनी देओलचा 'बॉर्डर 2' करणार ग्रँड ओपनिंग; अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये केली बंपर कमाई

Badlapur Crime: स्कूल व्हॅनमध्ये चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीच्या मुसक्या आवळल्या; बदलापूर पुन्हा हादरले

SCROLL FOR NEXT