kalyan dombivli municipal corporation Saam tv
मुंबई/पुणे

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढणार; वंचितसोबत चर्चा अंतिम टप्प्यात

kalyan dombivli municipal corporation : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढण्याची शक्यता आहे. त्यांची वंचितसोबत चर्चा अंतिम टप्प्यात आहे.

Vishal Gangurde

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी आघाडीची रणनीती अंतिम

काँग्रेस आणि शरद पवार गट यांच्यात जागावाटपावर शिक्कामोर्तब झालंय

वंचित बहुजन आघाडीसोबत देखील सकारात्मक चर्चा सुरू

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी आघाडीची रणनीती जवळपास अंतिम झाली आहे. काँग्रेस आणि शरद पवार गट यांच्यात जागावाटपावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत देखील सकारात्मक चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. आगामी पालिका निवडणूक मोठ्या तयारीने लढवून महाविकास आघाडीचा महापौर बसवण्याचा निर्धार दोन्ही पक्षांनी व्यक्त केला आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित करण्यात आला आहे. या बैठकीस खासदार बाळ्यामामा म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर, प्रदेश सचिव ब्रिज दत्त, सचिव नवीन सिंग, मुन्ना तिवारी, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष वंडार पाटील आदी प्रमुख नेते उपस्थित होते.

बैठकीनंतर माहिती देताना काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी सांगितले की,१२२ नगरसेवकांच्या महापालिकेत ५२ ते ५५ जागांवर काँग्रेस, ४५ ते ४७ जागांवर राष्ट्रवादी शरद पवार गट निवडणूक लढवणार आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा सुरू असून त्यांच्यासाठीही ठराविक जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. उर्वरित १२ जागांबाबत मित्र पक्षांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. ही बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली असून ज्या जागा जिंकण्याची जास्त क्षमता आहे त्या त्या पक्षांना प्राधान्य देण्याचे ठरले आहे'.

राजाभाऊ पातकर यांनी पुढे स्पष्ट केले की, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील एखाद-दोन जागांचा फरक चर्चेतून मिटवला जाईल, कारण आमचे लक्ष फक्त केडीएमसी जिंकण्यावर आहे.तसेच,वंचित बहुजन आघाडीसोबत सकारात्मक वातावरणात चर्चा सुरू असून त्यांनाही सन्मानजनक जागावाटप देण्याचा प्रयत्न आहे. दोन दिवसांत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

काँग्रेस पक्षाला मोठा प्रतिसाद मिळत असून २५६ इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत, त्यामुळे यावेळी काँग्रेस किंगमेकरच्या भूमिकेत असेल, असा दावाही पातकर यांनी केला.शिवसेना ठाकरे गटासोबत चर्चा झाल्याचे त्यांनी मान्य केले, मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तरीही पुढील दोन दिवसांत काही घडामोडी होऊ शकतात, असे संकेत त्यांनी दिले.एकूणच, महाविकास आघाडी मोठ्या तयारीने केडीएमसी निवडणूक लढवण्याच्या तयारीत असून, महापालिकेत आपला महापौर बसवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Elections: मुंबई महानगरपालिका निवडणूक; वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Maharashtra Politics: मोठी बातमी, अखेर काका-पुतणे एकत्र! दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती, अजितदादांची घोषणा

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का; भाच्याने केला अजित पवार गटात प्रवेश

Monday Horoscope : भगवान महादेवाची कृपा होणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात भाग्यकारक घटना घडणार

Bangladesh Violence: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळलं |VIDEO

SCROLL FOR NEXT