Kalyan Dombivli Muncipal Corporation Ravindra Chavan Saam Tv
मुंबई/पुणे

Ravindra Chavan : KDMC साठी भाजपचा स्वबळाचा नारा? १२२ जागांसाठी हजारो कार्यकर्त्यांची तयारी

Kalyan Dombivli Muncipal Corporation Ravindra Chavan : कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. १२२ प्रभागांत निवडणूक लढवण्याचे संकेत असून कार्यकर्त्यांना मोठ्या जबाबदाऱ्या देण्याची रणनीती आखण्यात आली आहे.

Alisha Khedekar

  • केडीएमसी निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी सुरू

  • सर्व १२२ प्रभागांत निवडणूक लढवण्याचे संकेत

  • हजारो कार्यकर्त्यांना संघटनात्मक जबाबदाऱ्या देण्याची रणनीती

  • स्वबळावर लढण्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा

संघर्ष गांगुर्डे, कल्याण-डोंबिवली

कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. कल्याण डोंबिवली परिसरात भाजपचे दहा ते वीस हजारांहून अधिक सक्रिय कार्यकर्ते असून, त्यापैकी केवळ १२२ जणांनाच थेट उमेदवारीची संधी मिळणार आहे. मात्र, उमेदवारी न मिळालेल्या कार्यकर्त्यांनाही संघटनेत महत्त्वाची भूमिका देऊन त्यांना मोठे करण्याचा निर्धार पक्षाने व्यक्त केला आहे.

भाजपकडून केडीएमसीतील सर्व १२२ प्रभागांमध्ये निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरू असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. प्रत्येक प्रभागात संघटनात्मक बांधणी, बूथनिहाय नियोजन आणि कार्यकर्त्यांचे जाळे अधिक मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजप पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे चित्र दिसत आहे.

दरम्यान, भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या सूचक वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजप केडीएमसी निवडणूक स्वबळावर लढवण्याच्या तयारीत आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक शिस्त आणि दीर्घकालीन राजकीय वाढ यावर भर दिला जात असल्याचेही कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.

एकीकडे उमेदवारीची संख्या मर्यादित असली तरी दुसरीकडे मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या देऊन त्यांना पुढील काळासाठी तयार करण्याची रणनीती भाजपने आखल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे केडीएमसी निवडणुकीत भाजपची भूमिका आणि स्वबळाचा निर्णय आगामी काळात अधिक स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM फडणवीसांच्या कार्यक्रमस्थळी अचानक ड्रोनच्या घिरट्या; पोलिसांची तारांबळ, राजकीय वर्तुळात खळबळ

टी२० वर्ल्डकपमध्ये व्हायव्होल्टेज सामना होणार, टीम इंडिया आणि पाकिस्तानशी भिडणार? महत्वाची अपडेट समोर

Maharashtra Live News Update: शेकटा–इसारवाडी महामार्गावर कंटेनर आणि आयशरची समोरासमोर धडक

Konkani Kadhi Recipe: कोकणची अस्सल चव, साधी ओल्या नारळाची कढी कशी बनवायची? लगेचच वाचा रेसिपी

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न का मिळाला नाही? RSS प्रमुख मोहन भागवत यांंचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT