सिंदखेडराजात २१ वर्षीय सौरभ तायडे नगराध्यक्ष म्हणून निवडून आला
तो महाराष्ट्रातील सर्वात तरुण नगराध्यक्ष ठरला
कोणत्याही मोठ्या प्रचार सभांशिवाय मिळवला विजय
तरुणाईच्या पाठिंब्याने शहर विकासाचे नवे व्हिजन मांडले
संजय जाधव, बुलढाणा
राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीच्या निवडणुकांचा काल निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत बुलढाण्यातील सिंदखेड राजा नगरपरिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादीत मोठ्या चुरशीची लढत झाली आणि यात राज्यातील सर्वात तरुण असलेल्या २१ वर्षीय सौरभ तायडे यांनी बाजी मारली. खरतर या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कुठल्याही बड्या नेत्यांची प्रचार सभा सिंदखेड राजात झाली नव्हती. याविरुद्ध एकनाथ शिंदे यांची सभा सिंदखेडराजात झाली होती. तरीही या तरुण उमेदवाराने बाजी मारली.
सिंदखेडराजामध्ये सर्व पक्ष वेगवेगळे लढले यात हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तरुण सौरभ तायडे यांनी बाजी मारत विजयाची माळ स्वतः कडे ओढली. सिंदखेडराजामधील नागरिक आणि तरुणांनी सौरभला भरघोस मतं देऊन नगराध्यक्ष केले. नुकतेच शिक्षण घेतलेला हा तरुण राजकारणात पडला व निवडून सुद्धा आला.
सिंदखेडराजा हे एक ऐतिहासिक शहर असून जिजाऊंचे जन्मगाव आहे. १५ वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी जिजाऊ जन्मोत्सवात येऊन सांगितले होते की, सिंदखेडराजा विकास आराखडा अंतर्गत विकास केला जाईल मात्र तो विकास आराखडा रखडला गेला. मात्र विकासा पासून कोसो दूर असलेल्या शहराच्या प्रथम प्राधान्य देत सौारभ तायडे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले. तसेच नवीन विकासाचं व्हिजन घेऊन मी आता उतरणार असून ते व्हिजन शरद पवार यांना भेटून त्याच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न मी करणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित तरुण नगराध्यक्ष सौारभ तायडे यांनी दिली आहे.
एम एस सी केमिस्ट्री झालेले सौरभ आजही बिएडच शिक्षण घेत आहे. राजकारणाचा कुठलाही गंध नसल्याने एकदम नगराध्यक्षाची माळ गळ्यात पडल्याने काम करण्यासाठी तरुणाईला सोबत घेऊन शहराचा विकास करणार असल्याचे त्याने माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. राज्यातील नगराध्यक्षपदी निवडून येणार सौरभ हा पहिलाच तरुण नसून सोलापूर जिल्ह्यातील २२ वर्षीय सिद्धी वस्त्रे हे देखील कमी वयात नगराध्यक्षपदी निवडून आल्याचे दुसरे उदाहरण आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.