KDMC Muncipal Corporation Election 2025-26 Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan - Dombivli : कल्याण डोंबिवलीत जागा वाटपावरून भाजपमध्ये नाराजी; कोणाच्या वाटेला किती जागा? वाचा

KDMC Election 2025 -2026 Mahayuti Seat Sharing Formula : कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना भाजप महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर जाहीर झाला आहे. मात्र भाजप पक्षात तीव्र नाराजी पाहायला मिळते आहे.

Alisha Khedekar

  • महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा जागा वाटप फॉर्म्युला जाहीर

  • कल्याण पूर्वेत भाजपला फक्त 7 जागा मिळाल्याने कार्यकर्ते नाराज

  • भाजप कार्यकर्त्यांनी सुलभा गायकवाड कार्यालयाबाहेर जमून घोषणाबाजी केली

  • मित्र पक्षांमुळे भाजप कार्यकर्त्यांची कोंडी

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

राज्यात महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून महायुतीत नाराजी नाट्य पाहायला मिळतं आहे. एकीकडे पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला कमी जागा मिळत असल्याने शिंदे सेनेचे कार्यकर्ते नाराज आहेत. तर दुसरीकडे शिवसेना भाजप महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर जाहीर झाला असून एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपाला कमी जागा मिळाल्या म्हणून भाजप कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना भाजप महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर जाहीर झाला आहे. त्यानंतर कल्याण पूर्वेत भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे. महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला 67 ,तर भाजपला 54 जागा देण्यात आल्या आहेत. मात्र, कल्याण पूर्व मतदारसंघात भाजपला अवघ्या 7 जागा मिळाल्याने कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री उशिरा भाजप आमदार सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांवर अन्याय करू नका न्याय न मिळाल्यास भाजप कल्याण पूर्वेत स्वबळावर निवडणूक लढवेल अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला. महायुतीतील जागावाटप करताना वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना विचारात घेतले नाही, असा आरोप यावेळी करण्यात आला.

मित्र पक्षांमुळे भाजप कार्यकर्त्यांची कोंडी होत असल्याची भावना व्यक्त करत, कार्यकर्त्यांना न्याय द्यावा अशी मागणी जिल्हाध्यक्ष नंदु परब, तसेच निवडणूक प्रमुख नाना सूर्यवंशी यांच्याकडे करण्यात आली. यावेळी नाना सूर्यवंशी यांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेत, त्या वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले. भाजपाला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्याचे त्यांनी मान्य करत, याबाबत वरिष्ठांशी चर्चा केली जाईल, असेही स्पष्ट केले.

मात्र, त्यांच्या आश्वासनानंतरही कार्यकर्त्यांची नाराजी कमी होताना दिसली नाही. एकीकडे महायुतीचा फॉर्म्युला ठरला असला, तरी दुसरीकडे या जागावाटपामुळे शिवसेना–भाजपमधील अंतर्गत वाद उफाळून आल्याचे चित्र आहे. आता या नाराजीवर महायुतीचे वरिष्ठ नेते काय तोडगा काढतात आणि कल्याण पूर्वेतील परिस्थिती कशी हाताळतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kale Khajoor Benefits: रोज सकाळी २ काळे खजूर खाण्याने होतात 'हे' आरोग्यदायी फायदे

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; तिकीट कापल्याने अनेक नेत्यांची अजित पवार गटात एन्ट्री

Maharashtra Election: सोलापुरात भाजपला डच्चू; शिवसेनेची राष्ट्रवादीसोबत युती; फॉर्म्युलाही ठरला

Maharashtra Live News Update: उल्हासनगरात भाजपाला मोठा धक्का, भाजपच्या जयश्री पाटील यांचा टीओकेमध्ये प्रवेश

मुंबईत अजित पवार गट स्वबळावर लढणार; ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणाला कुठून मिळाली संधी?

SCROLL FOR NEXT