kalyan dombivli municipal corporation Saam tv
मुंबई/पुणे

कल्याण-डोंबिवलीत महायुतीत दुरावा? शिंदे गटाच्या नेत्याचं भाजपला ओपन चॅलेंज,'याल तर सोबत, नाहीतर...'

kalyan dombivli municipal corporation : कल्याण-डोंबिवलीत महायुतीत दुरावा निर्माण झाल्याची चर्चा आहे. शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाने भाजपलाच आव्हान दिलं आहे.

Vishal Gangurde

शिंदे गट आणि भाजप यांच्यात कल्याण-डोंबिवलीत युतीसंदर्भात दुरावा झाल्याची चर्चा

अरविंद मोरे यांचं भाजपला थेट 'ओपन चॅलेंज'

महायुतीमध्ये जागावाटपावरून मतभेद उघड होत असल्याचे दिसत आहे

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

राज्यासह कल्याण-डोंबिवली महापालिकेतही निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. शिंदे गटाने आगामी निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढलेल्या महायुतीत स्थानिक स्वराज्य संस्थाच्य निवडणुकीत दुरावा निर्माण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बदलापुरात शिंदे गटाला वगळून भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने युती जाहीर झाली आहे. त्यानंतर आता कल्याण-डोंबिवलीतही महायुतीत दुरावा निर्माण झाल्याचं चित्र दिसत आहे. 'याल तर सोबत, नाही आला तर आडवे करू...अशा शब्दात शिंदे गटाचे नेते अरविंद मोरे यांनी भाजपला ओपन चॅलेंज दिलं आहे.

महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी प्रत्येक पक्ष हा निवडणुकीच्या तयारीला लागलेला दिसून येत आहे. शिवसेना शिंदे गटानेही आपली कंबर कसलेली पाहायला मिळत आहे.शिंदे गटासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणुक ही फार महत्वाची आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कल्याण-डोंबिवली हा बाल्लेकिल्ला मानला जातो. त्यातच श्रीकांत शिंदे इकडचे खासदार आहेत. भाजपसाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. कारण डोंबिवलीचे आमदार आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे शिवसेना-भाजप यात युती होते की दोघे स्वतंत्र लढणार यावर अजून शिक्का मोर्तब झालेलं नाही.

कल्याण-डोंबिवलीत ठाकरे गट आणि मनसे एकत्र आले आहे. त्यामुळे एक वेगळाच रंग या निवडणुकीला आला आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. त्यातच शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख याचा एका कार्यक्रमातला व्हिडिओ व्हायरल होत आहे. याल तर सोबत, नाहीतर...आडवे करू...कुणाला वाटत असेल बिना युतीने, कुठलंही काम न करता आम्ही निवडून येऊ शकतो, तर आम्ही स्वतः लढायला तयार आहोत, असे शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाने भाजपला थेट ओपन चॅलेंज दिले आहे.

'प्रत्येक जागांवर धनुष्यबाणावर निवडून आणा, अशा शब्दात कल्याण जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सज्जड दमही या व्हिडिओमध्ये दिला आहे. त्यामुळे शिंदे गटासाठी ही निवडणूक मोठ्या प्रतिष्ठेची झाल्याची दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे नाशिक महामार्गावरील रास्ता रोको तूर्तास स्थगित

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना गुड न्यूज, बँक खात्यावर आजपासून ₹१५०० खटाखट जमा होणार, बॅलेन्स चेक करा

Cyclone Alert : पुन्हा आस्मानी संकट! 'मोंथा'नंतर आणखी एका चक्रीवादळाचं सावट, महाराष्ट्रावर होणार परिणाम, IMD चा गंभीर इशारा

Leopard Terror: 15 दिवसांत बिबट्याने घेतला तिघांचा बळी,'नरभक्षक बिबट्याला गोळ्या घाला', गावकरी आक्रमक

Vote Chori: व्होटचोरीला हिंदू-मुस्लीमचा रंग; बोगस मतदारांचा फायदा नेमका कुणाला?

SCROLL FOR NEXT