Unauthorized Construction Saam TV
मुंबई/पुणे

KDMC News: कल्याण-डोंबिवलीत घर घेताना फसवणूक होणारच नाही; KDMC नं काढला जालीम तोडगा

Unauthorized Construction: बांधकामाची परवानगी प्राप्त असलेली माहिती साइटवर सहज दिसेल अशा ठिकाणी फलकावर लावण्यात यावी असा निर्णय कल्याण डोंबिलवी महानगरपालिकेने घेतला आहे.

Ruchika Jadhav

Illegal Building KDMC Action:

प्रत्येकाला आपलं हक्काचं घर असावं असं वाटतं. स्वप्नातलं घर सत्यात उतरवण्यासाठी सर्वजण मेहनत करतात, पैसे साठवतात आणि घराचं स्वप्न पूर्ण करतात. मात्र सध्या अनधिकृत बांधकामांचा सुळसूळाट सुटला आहे. घर खरेदी करताना बिल्डर्सकडून सविस्तर माहिती दिली जात नाही. त्यामुळे अनेक नागरिकांची घर खरेदीमध्ये फसवणूक होत आहे. मात्र नागरिकांच्या होणाऱ्या फसवणुकीला आता कायमचा चाप लागणार आहे. KDMC नं याबाबत जबरदस्त तोडगा काढलाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बांधकामाची परवानगी असलेली प्रत बांधकाम सुरू असलेल्या साइटवर सहज दिसेल अशा ठिकाणी फलकावर लावण्यात यावी असा निर्णय कल्याण डोंबिलवी महानगरपालिकेने घेतला आहे. या निर्णयाने अनधिकृत बांधकामात नागरिकांची होणारी फसवणूक रोखण्यास मोठी मदत होईल.

बांधकामाच्या ठिकाणी परवानगीचा फलक लावण्यासाठी व्यवसायिकांना तीन दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. पुढील तीन दिवसांत जर हे फलक लावले नाही तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील महापालिकेने दिला आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत बेकायदा बांधकामांचा सुळसूळाट सुटला आहे. कमी पैशांत मोठं घर मिळणार म्हणून अनेक गरजू नागरिक अशा फसवणुकीचे बळी ठरतात. घर खरेदी केल्यावर काही दिवसांनी ही जागा अनधिकृत असल्याचे नागरिकांना समजते. त्यामुळे मोठा गोंधळ होतो. असे केल्याने बिल्डर्स केवळ नागरीकांचीच नाही, तर महापालिका प्रशासन, राज्य सरकार आणि रेरा प्राधिकरणाचीही फसवणूक करत असतात.

KDMC ने घेतलेल्या या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील घराचं स्वप्न पाहताय आणि लोकेशन कल्याण हवं आहे? तर या जालीम तोडग्याचा तुम्हालाही फायदा होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: पुरूष लाभार्थी घुसलेच कसे? लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

मुंबई-आग्रा महामार्गावर बसचा भीषण अपघात, ८ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, १५ जखमी, ४ जणांची प्रकृती गंभीर

KDMC : केडीएमसीतील कंत्राटी कामगारांचे काम बंद; सुमित कंपनीत सामावून घेण्याची मागणी

Mumbai-Goa Highway : LPG गॅस टॅंकरला अपघात, ९ तासांपासून वाहतूक ठप्प | VIDEO

SCROLL FOR NEXT