Ladki Bahin Yojana Saam tv
मुंबई/पुणे

तुम्हाला Ladki Bahin Yojana ची eKYC करून देतो, महिलेचा मोबाइल घेऊन इन्स्टाग्राम अकाउंट बनवलं, नंतर इतरांना अश्लील व्हिडीओ पाठवले

Cyber Crime in Kalyan: कल्याणमध्ये लाडकी बहीण योजनेची ईकेवायसी करून देतो सांगत एका तरुणाने महिलेची फसवणूक केली. महिलेचा मोबाइल घेत त्यावरून तिच्या नावाचे इन्स्टाग्राम अकाऊंट बनवून इतरांना अश्लिल व्हिडीओ पाठवले.

Priya More

Summary -

  • लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली महिलेची फसवणूक

  • ईकेवायसीच्या नावाखाली महिलेचे तिच्याच मोबाइलवर इन्स्टाग्राम अकाऊंट बनवले

  • या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून इतरांना अश्लिल व्हिडीओ पाठवले

  • पोलिसांनी आरोपीला नोटीस पाठवली

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी करण्यासाठी खासगी एजंटने घृणास्पद कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली. महिलेच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून त्यावरून इतरांना अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवले. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. या प्रकरणात संबंधित ईकेवायसी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी नोटीस देऊन सोडून दिलं.

कल्याणमधील मोहने परिसरात एक धक्कादायक सायबर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे न आल्याने केवायसी करण्यासाठी संपर्क साधलेल्या खासगी एजंटने महिलेची फसवणूक केली. तिच्या नावाने सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार केल्याचा प्रकार समोर आला. संबंधित महिलेला योजनेचे पैसे मिळत नव्हते. चौकशी केल्यानंतर केवायसी न झाल्यामुळे पैसे येत नसल्याचे तिला समजले.

या महिलेने परिसरातील काही लोकांच्या सांगण्यावरून रूतिक खंडारे नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधला जो केवायसी करून देतो अशी माहिती देण्यात आली होती. आरोपीने ईकेवायसीसाठी आवश्यक कागदपत्रे आणि एक हजार रुपये घेतले. तसेच ओटीपी प्रक्रियेसाठी महिलेचा मोबाइल देखील काही वेळासाठी स्वतःकडे घेतला. मात्र, काही दिवस उलटल्यानंतरही केवायसी पूर्ण झाली नाही आणि महिलेला पैसे मिळाले नाहीत.

यानंतर संबंधित महिलेकडे एक व्यक्ती तक्रार करू लागला की तिच्या नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्याला अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवले जात आहेत. ही बाब ऐकून महिला चक्रावली कारण तिला इन्स्टाग्रामबद्दल माहितीही नव्हती. महिलेच्या मुलीने तपास केला असता रूतिक खंडारे या एजंटने महिलेचा मोबाईल वापरून तिच्या नावाने इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून लोकांना अश्लील संदेश पाठवले असल्याचे उघड झाले.

या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत. या प्रकरणात संबंधित आरोपी रूतिक खंडारेला नोटीस देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. तसेच नागरिकांनी अशा प्रकारच्या एजंट्सपासून सावध राहण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टिटवाळा उड्डाणपुलावर आणखी एक जीवघेणा अपघात

Honey Bee Attack: वेरूळ लेणी पहायला गेले असता भयंकर घडलं; 100 पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला

Titwala Crime: परप्रांतियांची मुजोरी! मराठी कुटुंबाला सळई- काठीने मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Nashik: नायब तहसीलदाराला अटक, म्हाडा भूखंड घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई

Crime News: एकीकडे नातेवाईकाच्या लग्नाची धामधूम सुरू; दुसरीकडे सासू अन् जावई शेतात सापडले नको त्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT