Kalyan Crime saam tv
मुंबई/पुणे

Kalyan Crime: कल्याणमध्ये भरचौकात तरुणीसोबत अश्लील वर्तन, पोलिसांनी तासाभरात आरोपीला ठोकल्या बेड्या

Kalyan Police: कल्याणमध्ये एका तरुणाने तरुणीसोबत भरचौकात अश्लील वर्तन केले. एकटी असल्याचा फायदा घेत आरोपीने हे कृत्य केले. पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीला अटक केली.

Priya More
  • कल्याणमध्ये तरुणीसोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर

  • पोलिसांनी आरोपीला तासाभरात केली अटक

  • जोशीबाग परिसरातील धक्कादायक घटना

  • महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याणमध्ये भररस्त्यात २२ वर्षीय तरुणीसोबत तरुणाने अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणी घराच्या दिशेने जात असताना आरोपी त्याठिकाणी आला. त्याने तरुणीसोबत अश्लील वर्तन केले आणि पळून गेला. या घटनेत तरुणी प्रचंड घाबरली. तिने या प्रकरणी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या. या घटनेमुळे कल्याणमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमधील जोशीबाग परिसरात २२ वर्षीय तरुणीसोबत भररस्त्यात गैरवर्तन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. पीडित तरुणी रस्त्याने चालत असताना प्रथमेश जाधव नावाचा तरुण तिच्यासमोर आला. त्याने तरुणीसोबत गैरवर्तन करत अश्लील प्रकार केल्याचा आरोप आहे.

घटना घडल्यानंतर आरोपी तेथून पळ काढला. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक आणि महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले चौक पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिकांच्या मदतीने आरोपीचा शोध घेत अवघ्या एका तासाच्या आत भाजी विक्रेता तरुण प्रथमेश जाधवला अटक केली. पोलिसांनी आरोपीविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kanyapujan Gifts : नवरात्रीत कन्या पूजनाला द्या ६ हटके गिफ्ट्स? मुलींच्या चेहऱ्यावर हसू आणणारे बजेटफ्रेंडली वाण

Maharashtra News Live Update: नवी मुंबई मनपा कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट

Saturday Horoscope : भावनेपेक्षा व्यवहाराला महत्त्व द्या! ७ राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत खालवली; तातडीनं रुग्णालयात दाखल

विधानपरिषद निवडणुकीत शिंदेसेना-भाजप आमनेसामने; महायुतीतला वाद चव्हाट्यावर

SCROLL FOR NEXT