Kalyan Traffic police Beaten Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan Crime: कल्याणमध्ये वाहतूक पोलिसावर हल्ला, २ तरुणांकडून रक्त येईपर्यंत बेदम मारहाण

Kalyan Traffic police Beaten: कल्याणमध्ये ट्राफिक पोलिसाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन तरुणांनी भररस्त्यात वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करत मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

Priya More

Summary -

  • कल्याणमध्ये वाहतूक पोलिसावर हल्ला

  • दोन तरुणांकडून बेदम मारहाण

  • पोलिस जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत

  • दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला

संघर्ष गांगुर्डे,कल्याण

कल्याणमध्ये वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यात आली आहे. कल्याण पूर्वेतील नांदिवली तर्फ परिसरात ही घटना घडली. या परिसरातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत असताना दोन तरुणांनी वाहतूक पोलिसाला रक्त येईपर्यंत मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी नागरिकांनी संताप व्यक्त केला.

संबंधित वाहतूक पोलिस नांदिवलीच्या तर्फ परिसरात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्त्यावर कार्यरत होते. यावेळी त्यांनी एका कारमधील दोन व्यक्तींना वाहन बाजूला घेण्यास सांगितले. मात्र, याचा राग आल्याने त्या दोघांनी पोलिसाला शिवीगाळ करत ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेत देविदास गोपाळ वाघेरे हे वाहतूक पोलिस जखमी झाले आहेत. ते कोळसेवाडी वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. जखमी पोलिसावर उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

या प्रकरणी वाहतूक पोलिस देविदास गोपाळ वाघेरे यांच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिस ठाण्यात सागर जगन्नाथ साळुंखे आणि आतिष दहातोंडे या दोन तरुणांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण करणे तसेच मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोळसेवाडी पोलिसांकडून सुरू आहे. दोन्ही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली जात आहे. या दोघांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विमानतळावर अचानक झाला गोळीबार; शिंदेंसेनेच्या नेत्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, राजकारणात खळबळ

Heart Attack Risk: रोज ६ तासांपेक्षा कमी झोपताय? मग, हृदयावर होऊ शकतात ‘हे’ ७ गंभीर परिणाम

Lek Ladki Yojana : मुलींसाठी सरकारची मोठी भेट! लाडक्या लेकीला जन्मापासून 18 वर्षांपर्यंत मिळणार ₹1.01 लाख, अर्ज प्रक्रिया सोपी

Maharashtra News Live Update: मंत्री येणार म्हणून घाईघाईत काम, चाकण तळेगाव रोडवर एका तासातच कामाचा बोजवारा

श्रावणात उपवास धरल्याने शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या ‘हे’ ५ फायदे

SCROLL FOR NEXT