>> अभिजीत देशमुख
Kalyan Crime : कल्यामध्ये चोरट्याने लपवून ठेवलेले मोबाईल ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांना अडवण्यासाठी महिलांनी चक्क अंगावरचे कपडे उतरवण्यास सुरुवात केल्याची घटना घडली आहे. दरम्यान कारवाईत अडथळा आणल्यामुळे कल्याण रेल्वे पोलिसांत त्या महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबात अधिक माहिती अशी की, कल्याण रेल्वे पोलिसांनी एका मोबाईल चोरट्याला अटक केली. या चोरट्याने चोरलेला मोबाईल तो राहत असलेल्या ठिकाणी लपवून ठेवला होता. हा मोबाईल ताब्यात घेण्यासाठी पोलीस तो राहत असलेल्या ठिकाणी गेले. तेव्हा त्यांना कारवाईपासून रोखण्यासाठी तेथील तीन महिलांनी चक्क आपले कपडे उतरवले.
महिलांचे हे कृत्य पाहून काही वेळ पोलिसांना घाम फुटला. मात्र नंतर पोलिसांनी कशीतरी परिस्थिती शांत केली. यादरम्यान धिंगाणा घालणाऱ्या महिलांनी तेथून पळ काढला. या प्रकरणी या पोलिसांच्या कारवाईमध्ये अडथळा आणणाऱ्या तिन्ही महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका प्रवाशाचा मोबाईल चोरून पसार झालेल्या चोरट्याचा पोलीस शोध घेत होते. ही चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. या फुटेजवरून पोलिसांनी चोरट्याला अटक केली. त्यानंतर पोलीस मोबाईल घेण्यासाठी त्याच्या घरी गेले तेव्हा हा संपूर्ण प्रकार घडला. कल्याण रेल्वे यार्डापासून ते कर्पेवाडी परिसरात हा धिंगाणा सुरु होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.