Maharashtra rain with hailstorm
Maharashtra rain with hailstormSaam Tv

Maharashtra Weather Update: राज्यातील या जिल्ह्यात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज!

IMD Rain Alert : येत्या काही तासांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारा पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
Published on

Maharashtra News: ऐन उन्हाळ्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. या पावसामुळे पिकांचे नुकसान होत असल्यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आला आहे. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. अशामध्ये आता हवामान खात्याने (Meteorological Department) येत्या काही तासांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारा पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

Maharashtra rain with hailstorm
Nashik Bus Accident: नाशिकमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, महिला कंडक्टरचा जागीच मृत्यू

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील धुळे, नंदुरबार, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर ,सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते चार तासांत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसंच कोल्हापूर, धुळे आणि औरंगाबाद या जिल्ह्यातील काही भागांमध्ये गारा पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Maharashtra rain with hailstorm
Nana Patole Reaction:...मी सुद्धा अयोध्येला जाणार आहे; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

आज नागपूर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे उन्ह आणि उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागपूरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

ऐकीकडे या पावसामुळे गरमीतून नागपूरकरांची सुटका झाली पण दुसरीकडे शेतकरी चिंतेत आले आहेत. कारण या पावसाचा फटका गहू, हरभरा, संत्रा आणि भाजीपाला पिकांना बसल्याची शक्यता आहे. तसंच, शनिवारपर्यंत नागपूरमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Maharashtra rain with hailstorm
Gautami Patil On Politicians: उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे?; गौतमीचं पहिलंच उत्तर जोरदार व्हायरल

दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यात अनेक ठिकाणी सुसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या वाऱ्यामुळे घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाले तर काही ठिकाणी घरांची पडझड झाली. हवामान खात्याने या भागांमध्ये ९ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यवतमाळच्या महागांव तालुक्यातील थार बुद्रक येथे विज पडून दोन बैलांचा जागीच मृत्यू झाला.

Edited By - Priya Vijay More

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com