manpada police station  Saam TV
मुंबई/पुणे

Kalyan Crime News: कल्याणमध्ये चाललंय काय? टोळक्यांकडून तरुणासह त्याच्या पत्नीला बेदम मारहाण, काय आहे प्रकरण?

Kalyan Crime News: कल्याणमध्ये खासगी कंपनीच्या लाईन टाकण्याच्या वादातून एका तरुणासह त्याच्या पत्नीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख

Kalyan crime News in Marathi :

कल्याणमधून एक मोठी बातमी हाती आली आहे. कल्याणमध्ये खासगी कंपनीच्या लाईन टाकण्याच्या वादातून एका तरुणासह त्याच्या पत्नीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. कल्याणमधील आडीवली परिसरात ही घटना घडली आहे. चंदन झा असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे.

सोनू ठाकूर व त्याच्या साथीदारानी मारहाण केल्याचा आरोप चंदन झा याने केला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र तरुणाला व त्याच्या पत्नीला टोळक्याकडून मारहाण केली जात असताना नागरिकांनी बघ्याची भूमिका घेतली होती. (Latest Marathi News)

कल्याण पूर्वेकडील अडीवली ढोकळी परिसरात चंदन आपल्या कुटुंबासह राहतो. एका खाजगी कंपनीच्या टॉवरवरून चंदन व त्याच्या भावांमध्ये वाद सुरू आहेत. या टॉवरला लाईन टाकण्याचे काम सुरू होते. चंदनने या कामाला विरोध केला. यावरून धमकी आल्याचा आरोपीही चंदनने केला आहे. आज सकाळी याच वादातून चंदन झा व त्याच्या पत्नीला काही तरुणांच्या टोळक्याने मारहाण केली.

याबाबत चंदन झा यांनी सांगितले की, माझ्या घरावर असलेल्या मोबाईल टॉवरला माझा विरोध आहे. त्यातून माझे भावांशी वाद सुरू आहेत. या टॉवरला लाईट टाकण्याचे काम सुरू आहे. मी या कामाला विरोध केला. त्यावेळी मला राहुल पाटील यांचा फोन आला, त्याने धमकी दिली. आज पुन्हा राहुल पाटील यांचे हस्तक सोनू ठाकूर यांने काही तरुणांसह मला मारहाण केली. माझी पत्नी मला सोडवण्यासाठी आली असता माझ्या पत्नीला देखील धक्काबुक्की करत मारहाण केली.

दरम्यान, या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी पुन्हा दाखल करत कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले. तर याबाबत राहुल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेचे माझा काही संबंध नाही. माझ्यावर चुकीचे आरोप केले जात असल्याचे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EVM: उंदराने भेदला स्ट्राँगरुमचा पहारा, स्ट्राँगरुमचा दरवाजा उघडला, राज्यात खळबळ

Prithviraj Chavan: 19 डिसेंबरला होणार मराठी पंतप्रधान'; पृथ्वीराज चव्हाणाचं वक्तव्य, राज्यात खळबळ

Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईतील स्थानिक गुंडांकडून भररस्त्यात पोलिसांवर हल्ला

IND vs SA 3rd T20I: भारतीय 'धुरंधरां'चा करिष्मा; ७ विकेट राखत टीम इंडियाचा शानदार विजय, मालिकेत २-१नं आघाडी

ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना बसणार मोठा धक्का; बड्या महिला नेत्या भाजपमध्ये प्रवेश करणार?

SCROLL FOR NEXT