Kalyan Bike Theft Crime News प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

Kalyan Crime: महागड्या दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला कल्याण गुन्हे शाखेकडून अटक

Kalyan Bike Theft News : पोलिसांनी सापळा रचत प्रीमियर कॉलनी मानपाडा येथून एका आरोपीला ताब्यात घेतले.

प्रदीप भणगे

कल्याण-डोंबिवली: कल्याण-डोंबिवली शहरात दुचाकी चोरीच्या घटना या सातत्याने घडत आहे. अशाच एका घटनेत कल्याण (Kalyan) गुन्हे शाखा ३ कडून सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा तपास सुरू होता. याप्रकरणी पोलिसांनी सापळा रचत एकाला अटक केली आहे. (Kalyan-Dombivali Latest News)

हे देखील पाहा -

यातील आरोपी मानपाडा-शीळ रोड परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती सहायक पोलिस निरीक्षक मोहन कळमकर आणि पोलिस शिपाई गुरुनाथ जरग यांना मिळाली. यांनंतर कल्याण गुन्हे शाखा ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांच्या मार्गदशनाखाली पोलिसांनी सापळा रचत प्रीमियर कॉलनी मानपाडा येथून एका आरोपीला ताब्यात घेतले.

पोलिसांनी अधिक तपास केला असता दीड लाख रुपये किंमतीची R15 मोटारसायकल आणि पंचावन्न हजार किंमतीची शाईन मोटारसायकल आणि मोबाईल असा २ लाख १५ हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच जी मोटारसायकल चोरली आहे, तशाच मोटारसायकलचा नंबर आरोपी चोरलेल्या मोटारसायकलवर लावत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Car Price Drop: GST कमी झाल्यावर ७५,००० रुपयांनी स्वस्त झाली टाटाची कार, आता किंमत किती?

डेंग्यूच्या आजाराचा डास कसा ओळखाल?

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

SCROLL FOR NEXT