Kalyan Crime News Pregnant Woman Loses Unborn Child Saam
मुंबई/पुणे

भयंकर! गरोदर महिलेच्या पोटावर लाथ मारली, क्षुल्लक वादामुळे जन्माला येण्यापूर्वीच बाळाचा मृत्यू

Pregnant Woman Loses Unborn Child: कल्याणच्या मोहने गावात क्षुल्लक वादातून भीषण हाणामारी. आरोपीकडून गरोदर महिलेवर जीवघेणा हल्ला. महिलेच्या पोटातील बाळाचा मृत्यू.

Bhagyashree Kamble

संघर्ष गांगुर्डे, साम टिव्ही

कल्याणजवळील मोहने गावातील लहूजीनगर परिसरात एक भयंकर घटना उघडकीस आली. क्षुल्लक कारणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला. वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. यादरम्यान, गरोदर महिलेवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. आरोपीनं गरोदर महिलेच्या पोटावर जोरात लाथ मारली. या मारहाणीमुळे महिलेच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण–कसारा रेल्वे मार्गालगतच्या मोहने गावतील लहूजीनगर परिसरात क्षुल्लक कारणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये वाद झाला होता. तक्रारदाराच्या मित्राच्या डोक्यावरची टोपी आरोपीने काढून स्वतःच्या डोक्यावर ठेवली. त्यानंतर तक्रारदाराने ती टोपी परत घेत आपल्या मित्राला दिली. याच क्षुल्लक कारणाचा मनात राग धरून आरोपीने वाद घालत मारहाण सुरू केली.

हाणामारी दरम्यान आरोपीने गरोदर महिलेला लक्ष्य करत तिच्या पोटावर जोरात लाथ मारली. या मारहाणीत गरोदर महिला गंभीर जखमी झाली. गरोदर महिलेला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारासाठी रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी पोटातील बाळ मृत झाल्याचे सांगितले.

या धक्कादायक प्रकारानंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरु केला आहे. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक कार्यरत असून, पुढील चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी साजरी केली गोपीनाथ मुंडेंची जयंती

6, 6, 6, 6, 6, 6, 6, 6, 6....वैभव सूर्यवंशीनं पाडला षटकारांचा पाऊस; UAE विरुद्ध ठोकलं तुफानी शतक

Late Night Sleep: रात्री १ वाजता झोपणाऱ्यांना डिप्रेशनचा धोका; लेट नाईट स्लीप पॅटर्न मानसिक आरोग्यासाठी घातक

महापालिका निवडणुका एकत्र लढवणार का? एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात विषय संपवला

Pilot Working Time: पायलट आठवड्यातून किती तास काम करतात?

SCROLL FOR NEXT