Kalyan Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Kalyan Crime News: खिडकीतून तो घरात शिरला; मध्यरात्री महिलेवर प्राणघातक हल्ला झाला; पुढे काय घडलं?

Crime News: रविवारी रात्री तो बेकरीत कामात असताना पत्नी सोनम घरात एकटीच होती.

Ruchika Jadhav

अभिजित देशमुख

Kalyan News:

कल्याणमध्ये एक खळबळजनक घटना घडलीये. रविवारी मध्य रात्रीच्या सुमारास घराच्या खिडकीतून घरात शिरून एका महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. कल्याण कोळवली परिसरात ही घटना घडलीये. महिलेच्या गळ्यावर आणि हातावर सपासप वार करुन हल्लेखोर पसार झालाय. (Latest Marathi News)

जखमी महिला सोनम पाल हिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. मात्र हा हल्ला कशासाठी करण्यात आला याचा उलगडा तपासाअंती होणार आहे.

कल्याण पश्चिमेतील कोलीवली रोड परिसरात वैशाली भोईर चाळ आहे. या चाळित नितेश पाल हा पत्नी सोनमसोबत राहतो. नितेश जवळच्या एका बेकरीत कामाला आहे. रविवारी रात्री तो बेकरीत कामात असताना पत्नी सोनम घरात एकटीच होती. रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास सोनम घरात एकटी असताना घराच्या खिडकीतून एक इसम घरात आला.

त्याने सोनमच्या गळ्यावर आणि हातावर धारदार हत्याराने हल्ला केला. या हल्ल्यात सोनम गंभीर जखमी झाली. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटना घडताच खडकपाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. हल्लेखोर पसार झाला.

डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी सर्जेराव पाटील, शरद जिने आणि अनिल गायकवाड यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. सोनमवर कोणी आणि कशाच्या उद्देशाने हल्ला केला आहे याची माहिती समोर आली नाही. काही दिवसांपूर्वीच सोनम ही तिच्या मूळ गावातून पतीसोबत कल्याणमध्ये राहण्यास आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Crime: नवऱ्याचं डोकं सटकलं; चार्जरच्या वायरने बायकोचा गळा आवळला, नंतर स्वत:लाही संपवलं

Maharashtra Live News Update : पुण्यातील रामवाडीमध्ये पेट्रोल चोराने सहा मोटरसायकल जाळल्या

Sara Arjun: रणवीर सिंगसोबत 'धुरंधर' चित्रपटात झळकणारी अभिनेत्री नक्की आहे तरी कोण?

Manikgad Fort Tourism : नयनरम्य निसर्ग अन्...; पनवेलपासून हाकेच्या अंतरावर वसलाय ऐतिहासिक किल्ला, एकदा पाहाच...

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधानची नवीन मालिका कोणती?

SCROLL FOR NEXT