Kalyan Railway Station  Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan Railway Station : कल्याण रेल्वे स्थानकात आढळली डिटोनेटर स्फोटके, परिसरात एकच खळबळ

Kalyan Railway Station Latest News : कल्याण रेल्वे स्थानकावरून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. कल्याण रेल्वे स्थानकावरील एक नंबर प्लॅटफॉर्मवर डिटोनेटर स्फोटके आढळले आहेत. एका बॉक्समध्ये एकूण ५४ डिटोनेतर स्फोटके आढळले आहेत.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, कल्याण

Kalyan Railway station News:

कल्याण रेल्वे स्थानकावरून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. कल्याण रेल्वे स्थानकावरील एक नंबर प्लॅटफॉर्मवर डिटोनेटर स्फोटके आढळले आहेत. एका बॉक्समध्ये एकूण ५४ डिटोनेटर स्फोटके आढळले आहेत. पोलिसांना फोन आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या वृत्तानंतर कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात एकच खळबळ उडाली. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण रेल्वे स्थानकात एक नंबर प्लॅटफॉर्मवर एस्केलेटरच्या शेजारी एका बॉक्समध्ये 54 डिटोनेटर सापडल्याने स्टेशन परिसरात एकच खळबळ उडाली. आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास रेल्वे पोलिसांना फोन आला. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी स्टेशनवरील प्लॅटफॉर्म नंबर एकवर दोन बॉक्स आढळले . या बॉक्समध्ये डिटोनेटर होते. याबाबत तत्काळ बॉम्बशोधक पथकाला माहिती देण्यात आली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बॉम्ब शोधक पथकाने घटनास्थळी धाव घेतली, त्यानंतर हे डिटोनेतर ताब्यात घेतले आहे. कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड वर्दळ असते. वर्दळीच्या वेळी ही घटना समोर आल्याने स्टेशन परिसरात एकच खळबळ उडाली होती. सध्या रेल्वे पोलीस ,बॉम्बशोधक पथक, कल्याण डीसीपी हे या घटनेचा तपास करत आहेत.

पोलिसांचा मोठा फौजफाटा परिसरात तैनात करण्यात आला आहे. कल्याण रेल्वे स्टेशनवर स्फोटके कोणी आणले ,कधी आणले , रेल्वे स्थानकावर का ठेवले , याचा तपास आता पोलीस करत आहेत.

नेहमी गर्दी असणाऱ्या कल्याण रेल्वे स्टेशनवर डिटोनेटर सापडल्याने लोकांच्या सुरक्षितेताचा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: सकाळी डॉक्टरचं कर्तव्य अन् रात्री UPSC चा अभ्यास; IPS डॉ. आदिती उपाध्याय यांचा प्रेरणादायी प्रवास

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Voter ID: दोन मतदार ओळखपत्र आहेत? होऊ शकते जेल; कारण काय? जाणून घ्या

Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण, पाहा सोन्याचा आजचा भाव

SCROLL FOR NEXT