Kalyan girl assault case Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan Crime: अपहरण करून घरात नेलं, अत्याचारानंतर निर्घृण हत्या, कल्याणच्या घटनेचा असा झाला उलगडा

Kalyan girl assault case: कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीची अत्याचार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेप्रकरणी आरोपी आणि त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण नेमकं कसं घडलं त्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

Priya More

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेने कल्याण हादरले. दुकानावर चॉकलेट आणण्यासाठी गेलेल्या १३ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर आरोपीने तिच्यावर अत्याचार करून हत्या केली. तिचा मृतदेह कल्याणनजीकच्या बापगाव परिसरात फेकून दिला.

याप्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी विशाल गवळीला बुलडाण्याच्या शेगावमधून अटक केली. विशालची पत्नी देखील पोलिसांनी अटक केली. तसंच त्याच्या मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या दोघांनी विशालला मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केली. आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड झाली.

सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास १३ वर्षांची मुलगी चॉकलेट आणण्यासाठी दुकानामध्ये गेली होती. या मुलीचे अपहरण करण्यात आले होते. बराच वेळ मुलगी घरी न आल्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. ९ तास झाला तरी मुलगी न सापल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी कोळशेवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तपास सुरू केला.

मंगळवारी या मुलीचा मृतदेह भिंवडीजवळच्या बापगावमध्ये आढळला. त्यानंतर पोलिसांनी मुलगी राहत असलेल्या परिसरातले सीसीटीव्ही तपासले त्यामध्ये मुलगी जाताना दिसली. तपास करत असताना पोलिसांना एका घराच्या परिसरामध्ये रक्ताचे डाग दिसून आले. त्याठिकाणी राहणारा विशाल गवळी हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी विशाल गवळीच्या पत्नी साक्षीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावेळी तिने पतीने मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली असल्याचे कबूल केले.

विशाल गवळीने मुलीचे अपहरण केले. तिला घरी नेले आणि तब्बल २ तास तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर तिची हत्या केली आणि मृतदेह बॅगेमध्य भरला. विशालच्या घरामध्ये सगळीकडे रक्त पडले होते. बँकेमध्ये काम करणारी विशालची पत्नी साक्षी घरी आली. तिने घरामध्ये रक्ताचा थारोळा पाहिला. विशालने आपल्या पत्नीला सर्व काही सांगितले. साक्षीने विशालला हे असं का केलं याचा जाब विचारण्याऐवजी घरात साडलेले रक्त पुसून काढले. त्यानंतर विशालने रात्री साडेआठ वाजता मित्राची रिक्षा बोलावून घेतली.

विशाल आणि त्याच्या पत्नीने मृतदेह भरलेली बॅग घेतली. रिक्षामधून ते बापगाव परिसरातील गेले आणि तिथे असलेल्या कब्रस्थानजवल मुलीचा मृतदेह फेकून दिला. त्यानंतर विशालने आधारवाडी चौकातून दारूची बाटली खरेदी केली. त्याठिकाणावरून विशाल बुलडाण्यातील साक्षीच्या घरी निघून गेला. तर साक्षी कल्याणमधील आपल्या घरी निघून गेली. पोलिसांनी विशालला शेगावमध्ये जाऊन अटक केली.

विशालचे ३ लग्न झाले आहेत. साक्षी त्याची तिसरी पत्नी आहे. विशालवर विनयभंग, मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. त्याला काही प्रकरणात अटक देखील करण्यात आली होती. पोलिसांनी त्याला तडीपार देखील केले होते. काही दिवसांपूर्वी तो जामीनावर बाहेर आला होता. अशामध्ये त्याने हे हत्याकांड केले. विशाल गवळीला आज पोलिस कोर्टामध्ये हजर करणार आहेत. तर त्याची पत्नी साक्षीला कोर्टाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

SCROLL FOR NEXT