Kalyan Crime Saam TV
मुंबई/पुणे

Kalyan Crime: प्रवाशावर चाकू हल्ला करणं पडलं महागात, पोलिसांनी रिक्षाचालकाची काढली धिंड

Kalyan Railway Station: पुढील सीटवर बसण्यास नकार दिल्याने प्रवासी आणि रिक्षा चालकामध्ये वाद झाला होता. या वादामध्ये संतापलेल्या रिक्षा चालकाने प्रवाशावर चाकू हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये प्रवासी जखमी झाला होता.

Priya More

अभिजित देशमुख, कल्याण

पुढच्या सीटवर बसण्याच्या वादातून प्रवाशावर रिक्षा चालकाने चाकूने हल्ला केला होता. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात ही घटना घडली होती. या मुजोर रिक्षाचालकाला महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. स्टेशन परिसरातील अशा भाई रिक्षा चालकांची मुजोरी संपवण्यासाठी पोलिसांनी रिक्षा चालकाची कल्याण स्टेशन परिसरात वरात काढली. हल्लेखोर रिक्षाचालकाला स्टेशन परिसरातील सगळ्या रिक्षा स्टँडवर फिरवण्यात आले .

कल्याण रेल्वे स्थानक हे जंक्शन असल्याने लाखो प्रवासी या रेल्वे स्थानकातून प्रवास करतात. रात्रीच्या वेळी लांब पल्ल्याच्या गाड्या या रेल्वे स्टेशनला येतात. सकाळीच रेल्वेने मुंबईला गेलेले चाकरमाने देखील संध्याकाळी घराच्या दिशेने कल्याण रेल्वे स्टेशनवर परततात. त्यामुळे सायंकाळी प्रवाशांची मोठी वर्दळ असते. काही दिवसांपूर्वी पुढील सीटवर बसण्यास नकार दिल्याने एक प्रवासी आणि मारूफ पोके या रिक्षा चालकामध्ये वाद झाला होता.

संतापलेला रिक्षा चालकाने प्रवाशावर चाकूने हल्ला केला होता. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखल करत हल्ला करणाऱ्या रिक्षा चालकाला बेड्या ठोकल्या. कल्याण -डोंबिवली स्टेशन परिसरात या आधी देखील रिक्षाचालकांनी प्रवाशांशी वाद घालत हल्ला केल्याच्या देखील घटना घडल्या आहेत . नुकताच डोंबीवलीत रिक्षाचालकाने बस कंडकटरला मारहाण केली होती.

रिक्षाचालकांची वाढती मुजोरी लक्षात घेता या पार्श्वभूमीवर महात्मा फुले पोलिसांनी अशा मुजोर रिक्षा चालकांची जिरवण्यासाठी तसेच मुजोर रिक्षा चालकांवर जरब बसावी यासाठी प्रवाशावर चाकू हल्ला करणाऱ्या मारुफ पोके याची कल्याण स्टेशन परिसरात वरात काढली. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे प्रवाशांकडून कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस जास्त गळतात? 'हे' गैरसमज टाळा; तज्ज्ञांनी सांगितल्या केसांची योग्य काळजी घेण्याच्या सोप्या टिप्स

रविवारी लोकलचा मेगा ब्लॉक! मध्य आणि हार्बर मार्गावर होणार परिणाम; घराबाहेर पडताना वेळापत्रक पाहाच

Maharashtra News Live Update: Pune: पर्वती पायथा येथे अनेक वर्ष जुने असलेले वडाचे झाड पडले

१६७० मधील लढाईनं बदलला पुण्यातील 'या' डोंगरी किल्ल्याचा इतिहास

8th Pay Commission: शिक्षकांचा पगार किती वाढणार? किती मिळणार पेन्शन?

SCROLL FOR NEXT