Kalyan Crime : पुष्पा स्टाइल तस्करी, महाराष्ट्र व्हाया दमण, दादरा-नगर-हवेली; टेम्पो येताच कल्याणच्या पथकाची 'भरारी'

Kalyan News : टेम्पोमध्ये चोर कप्पा बनवून महाराष्ट्राचा महसूल बुडवून दमन, दादरा नगर हवेली राज्यातील विदेशी मद्याची महाराष्ट्रात तस्करी करण्यात येत असल्याचे उघडकीस आले
Kalyan Crime
Kalyan CrimeSaam tv
Published On

अभिजित देशमुख 
कल्याण
: दारू तस्करानी चक्क टेम्पोच्या खालच्या बाजूला मोठा चोरकप्पा बनवून त्यामध्ये विदेशी दारूची तस्करी करण्याचा करत होते. मात्र राज्य उत्पादन शुल्क ठाणे भागाच्या कल्याणच्या भरारी पथकाने विदेशी दारूच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सुमारे साडेपाच लाखांचा मद्यसाठा जप्त करत एका जणाला ताब्यात घेण्यात आले आहे.  

दमन, दादरा नगर हवेली येथील विदेशी दारूचा साठा महाराष्ट्रात आणून विक्री करण्याचा प्लान होता. वाडा- शहापूर मार्गावरून एका टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणात दमण, दादरा नगर हवेली येथील विदेशी मद्य महाराष्ट्रात विक्री करण्यासाठी बेकायदेशीर रित्या आणण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाच्या कल्याणच्या भरारी पथकाला मिळाली होती. 

Kalyan Crime
Dharangaon News : पतंग उडवताना घडले दुर्दैवी; विद्युत तारांचा स्पर्श होऊन मुलाचा मृत्यू

रिकाम्या टेम्पोला चोर कप्पा 

माहितीच्या आधारे कल्याणच्या भरारी पथकाचे इन्स्पेक्टर दिपक परब यांनी सहकाऱ्यांसह वाडा- शहापूर रोडवर सापळा रचला. याच दरम्यान संशयित टेम्पो दिसताच पथकाने टेम्पो अडवला. मात्र टेम्पो रिकामा दिसून आला. मात्र टेम्पोच्या मागील बाजूस असलेला पत्रा उचकटून पाहिला असता त्याखाली मोठ्या प्रमाणात विदेशी मद्य लपवून ठेवल्याचे आढळून आले. हे विदेशी मद्य दमण, दादरा नगर हवेली येथून महाराष्ट्रात विक्री करण्यासाठी बेकायदेशीर रित्या आणण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

Kalyan Crime
ST Fare Hike : एसटी भाडेवाढ विरोधात ठाकरे गट आक्रमक. नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये चक्काजाम

एकजण ताब्यात, चालक फरार 
भरारी पथकाने तत्काळ कारवाई करत साडेपाच लाखांचे विदेशी मद्य जप्त केले. याच दरम्यान संधीचा फायदा घेत टेम्पो चालक हा पसार झाला. तर त्याचा साथीदार हरिसिंग गहलोत याला एक्साईज विभागाने ताब्यात घेतलं. दरम्यान हा मद्य साठा नेमका कुठून आणला?, महाराष्ट्रात ते कोणाला विकणार होते याचा तपास आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुरू केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com