Kalyan Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan News: मराठी तरुणीला मारहाण करणाऱ्या परप्रांतीय तरुणाला अटक, मनसे कार्यकर्त्यांनी शोधून काढत दिला चोप; पाहा VIDEO

Kalyan Crime: कल्याणमध्ये मराठी तरुणीला अमानुष मारहाण करणाऱ्या तरुणाला अखेर पोलिसांनी अटक केली. मनसे कार्यकर्त्यांनी या तरुणाला शोधून काढले आणि त्याला चांगला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं.

Priya More

अभिजित देशमुख, कल्याण

कल्याणमध्ये मराठी तरुणीला परप्रांतीय तरुणाने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. गोकुळ झा असं आरोपीचे नाव असून तो घटनेनंतर फरार झाला होता. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. कल्याण पोलिसांनी फरार आरोपीला अटक केली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी या तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमध्ये एका रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या मराठी तरुणीला एका परप्रांतीय तरुणाने अमानुष मारहाण केली होती. आरोपीने तरुणीच्या पोटावर लाथ मारली त्यानंतर त्याने तिचे केस ओढत तिला जमिनीवर आपटले आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना रुग्णालयातील सीसीटीव्हीत कैद झाली. या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या मारहाणीत तरुणीच्या मानेला, छातीला दुखापत झाली आहे.

या प्रकरणातील आरोपी गोकुळ झा या घटनेनंतर फरार झाला होता. या प्रकरणी पीडित तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला होता. अखेर या आरोपीला मनसे कार्यकर्त्यांनी पकडले. अंबरनाथमधील नेवाळी येथून गोकुळ झा या तरुणाला मनसे कार्यकर्त्यांनी पकडले आणि चांगला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.

या प्रकरणातील आरोपी गोकुळ झा हा अट्टल गुनेहागार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कल्याणचे कोळशेवाडी पोलिस ठाणे, मानपाडा पोलिस ठाणे आणि विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात मारहाण करणे, धारधार हत्यार वापरणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे त्याच्याविरोधात दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

५ दिवसाआधी कल्याण कोळशेवाडीत एका ट्रक चालकाला मारहाण प्रकरणी आरोपी गोकुळ झा जामिनावर बाहेर आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मराठी तरुणीला मारहाण केल्या प्रकरणात कल्याण पोलिस अधिक तपास करत आहेत. गोकुळ झा या तरुणाला अटक करण्यापूर्वी तपासासाठी आरोपीच्या घरच्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेवरून आता मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. मनसे नेते अविनाश जाधव यांनी या तरुणीच्या घरी जाऊन तिची भेट घेतली आणि या मारहाणीचा बदला आम्ही घेऊ असा शब्द अविनाश जाधव यांनी तिला दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई ला पाणी पुरवठा करणारा तानसा धरण ओव्हर फ्लो

Maharashtra Housing Policy: स्वस्त-परवडणाऱ्या घरांची लॉटरी, जिथं नोकरी, तिथंच घरंही मिळणार, नेमका काय आहे प्लान, पाहा | VIDEO

Papaya Chutney Recipe : गुजरात स्पेशल पपईची चटणी, फक्त ५ मिनिटांत बनेल रेसिपी

Hair Care Tips: केस धुतल्यानंतरही जर तेल राहत असेल तर 'हे' करा

Pan Card Of Dead Person: व्यक्तीच्या मृत्यूनंतर पॅन कार्ड डिअ‍ॅक्टिव्हेट करणे आवश्यक आहे का?

SCROLL FOR NEXT