Sakshi Sunil Jadhav
पुण्यातील ब्रिटिशकालीन इमारतीत वसलेलं डेक्कन पोलिस ठाणे काळाच्या पडद्याआड जाणार आहे.
पुणे शहरातील डेक्कन पोलिस ठाणे कार्यरत असलेली, ऐतिहासिक आणि ब्रिटिशकालीन 'भाजेकर पॅव्हेलियन'ची इमारत आता नव्याने उभारली जाणारे.
डेक्कन जिमखाना क्लबने या जागेचा पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव पुणे पोलिस आयुक्तांना पाठवला आहे.
गेली सहा दशके डेक्कन पोलिस ठाण्याचा कारभार जिमखान्याच्या 'भाजेकर पॅव्हेलियन'च्या इमारतीतून चालवला जातोय.
१९२२ मध्ये हे पॅव्हेलियन उभारण्यात आलं जिथून अनेक खेळाडू ग्राउंड वर जात असे.
१९५५च्या सुमारास डेक्कन पोलिस ठाण्याचा कारभार या पॅव्हेलियनमधून सुरू झाला.
१९६१ मध्ये पुण्यातील पानशेत धरण फुटलं आणि त्याच्या पुराचे पाणी इथल्या छपरापर्यंत पोहचलं होतं त्याची पूररेषा सुद्धा इथे लिहिली आहे.