Kalyan : कोळसेवाडी पोलिसांच्या प्रसंगावधनाने मोठा अनर्थ टळला!  प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

Kalyan : कोळसेवाडी पोलिसांच्या प्रसंगावधनाने मोठा अनर्थ टळला!

कल्याण पूर्वेत काटेमानवली नाका ते चिंचपाडा रोडवरील व्यापाऱ्यांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबतच्या आवाहन पत्रिकाचे वाटप पोलीस करत होते. तेव्हा काही युवकांमध्ये हातात चाकू घेऊन भांडण सुरु होते.

प्रदीप भणगे

कल्याण : कल्याण पूर्वेत काटेमानवली नाका ते चिंचपाडा रोडवरील व्यापाऱ्यांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबतच्या आवाहन पत्रिकाचे वाटप पोलीस करत होते. यावेळी रस्त्यावर अचानक पणे वाहतूक कोंडी झाल्याने कोळसेवाडी पोलीस हवालदार प्रवीण देवरे, पोलीस नाईक कुणाल परदेशी, हे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गेले असता. त्याठिकाणी तीन इसम आपापसात भांडण करत असल्याचे त्यांच्या दिसले.

हे देखील पहा :

त्यातील एक तरुण धारधार शस्त्राने दोन जणांना मारत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. यावेळी पोलिसांनी चाकू मारत असलेल्या तरुणाला जमिनीवर खाली पाडून त्याच्या हातातला रक्ताने भरलेला चाकू हिसकावून आरोपीस ताब्यात घेतले. तसेच जखमी झालेले विशाल पाटील व दीपेश रसाळ यांना रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.

जखमी झालेल्या विशाल व दीपेश यांच्या सांगण्यावरून आरोपी मयूर दराडे याच्यावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास कोळसेवाडी पोलीस करत आहे. या केलेल्या धाडसी कामगिरी मुळे सर्व स्तरातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख, पोलीस हवालदार प्रवीण देवरे, पोलीस नाईक कुणाल परदेशी, यांचे कौतुक होत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणीत भर पावसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून पिकांच्या नुकसानीची पाहणी

Video : तेरे जैसा यार... दंडाधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून गाणं गाणे भोवलं! तहसीलदाराचे निलंबन

GST : छत्र्या, मोबाइल, कपडे ते सायकल, सिमेंट होणार स्वस्त, वाचा केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन

मेट्रोच्या एका कोचची किंमत किती असते?

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी थेट दिल्लीत आंदोलन, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

SCROLL FOR NEXT