ओमिक्रॉनचं नवं संकट अन् तमाशा कलावंतांच्या आयुष्याचा तमाशा!

मागच्या दोन वर्षापासुन तमाशाला ब्रेक लागल्याने असंख्य तमाशा कलावंत बेरोजगार होऊन पोटाचं खळगं भरण्यासाठी हाताला मिळेल ते काम करु लागले होते.
ओमिक्रॉनचं नवं संकट अन् तमाशा कलावंतांच्या आयुष्याचा तमाशा!
ओमिक्रॉनचं नवं संकट अन् तमाशा कलावंतांच्या आयुष्याचा तमाशा! SaamTv

जुन्नर : कोरोना (Corona) प्रादुर्भावामुळे राज्यातील यात्रा-जत्रा बंद होत्या. आता कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आलाय. मात्र, यात्रांमधील खरी रंगत टिकविणारा व महाराष्ट्राची लोककला असलेल्या तमाशाला ओमिक्रॉनच्या (Omicron Variant) नव्या संकटामुळे गावोगावच्या जत्रा-यात्रांमध्ये प्रशासनाकडून परवानगी मिळत नसल्याने पुन्हा ब्रेक लागला आहे.

जत्रा यात्रा म्हटलं कि तमाशाची बारी आलीच. मात्र, मागच्या दोन वर्षापासुन तमाशाला ब्रेक लागल्याने असंख्य तमाशा (Tamasha) कलावंत बेरोजगार होऊन पोटाचं खळगं भरण्यासाठी हाताला मिळेल ते काम करु लागले होते. सध्या कोरोना नियमांना शिथिलता मिळाल्याने पुन्हा तमाशाचे फड रंगणार असल्याची परवानगी राज्यसरकार कडुन देण्यात आली. मात्र, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून (police) तमाशाला खुल्या मैदानात परवानगी मिळत नसल्याने तमाशाला ब्रेक लागलाय. त्यामुळे पुन्हा एकदा तमाशा कलावंत हातावर हात देऊन बसलेत.

हे देखील पहा :

सध्या जत्रा यात्रांची सुरुवात होत असताना गावगाड्यांवर तमाशाचे फड रंगणार आणि दोन वर्षापासुन बेरोजगार असलेल्या कलावंताच्या हाताला काम मिळेल आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल असे वाटत होते. मात्र, अशातच प्रशासनाकडून परवानगी मिळत नसल्याने तमाशाला ब्रेक लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 15 डिसेंबर ला राज्यातील तमाशा फड मालक आणि कलावंत कऱ्हाड येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी उपस्थित राहून आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचा इशारा मराठा तमाशा कलावंत परिषदे कडुन देण्यात आलाय.

ओमिक्रॉनचं नवं संकट अन् तमाशा कलावंतांच्या आयुष्याचा तमाशा!
२८ वर्षीय महिला पोलीस कर्मचार्‍याची गळफास घेऊन आत्महत्या! संशयास्पद प्रकरण?

तमाशाची कला पन्नास वर्षापासुन जोपासत असताना राज्यात पडलेला दुष्काळ, जत्रा यात्रांवर आलेली संकटं यामुळे तमाशांना चांगलं दिवस राहिले नाहीत. त्यात दोन वर्ष कोरोना महामारीचे संकट..! अशा संकटातुनही लोककला जोपासत असताना पुन्हा एकदा ओमिक्रॉन चे नवीन संकट तमाशावर उभं राहिलं तर यंदाही तमाशा कलावंताची दैनाच होणार आहे.

महाराष्ट्राची लोककला जोपासणारे प्रसिद्ध कलावंत, फड मालक आज दोषोधडीला लागलेत त्यामुळे मायबाप सरकारने तमाशाची लोककला खुला मैदानावर यंदा सुरु होऊ दिली नाही तर हा कलावंत पुन्हा कधीच उभा रहाणार नाही आणि हि लोककला लोप पावेल अशी भीती व्यक्त होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com