CNG Price in Mumbai  Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan CNG Pump : सीएनजी पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, काय आहे नेमकं कारण?

Kalyan CNG Pump Latest marathi : कल्याणमध्ये सीएनजी पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. महानगर गॅस दुरुस्तीचे काम सुरू असल्याने तीन दिवस गॅस पुरवठा बंद राहणार असल्याची चर्चा रिक्षाचालकांमध्ये सुरु होती.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, कल्याण

kalyan cng pump Line :

कल्याणमध्ये सीएनजी पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. महानगर गॅस दुरुस्तीचे काम सुरू असल्याने तीन दिवस गॅस पुरवठा बंद राहणार असल्याची चर्चा रिक्षाचालकांमध्ये सुरु होती. त्यानंतर ही चर्चा वाऱ्यासारखी पसरल्यानंतर रिक्षा चालकांची सीएनजी पंपावर एकच गर्दी झाली. या गर्दीमुळे रस्त्यावर वाहनांचीही कोंडी पाहायला मिळाली. (Latest Marathi News)

कल्याणमध्ये तीन दिवस गॅस पुरवठा बंद होणार असल्याची चर्चा बुधवारी रात्री वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर कल्याणमधील सीएनजी पंपावर रिक्षा सीएनजी वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. कल्याणमधील दुर्गाडी चौकात असणारा सीएनजी पंपावर वाहनांच्या या रांगा पाहायला मिळाल्या. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नेमकं काय झालं?

सलग तीन दिवस गॅस पुरवठा बंद राहणार असल्याची चर्चा वाहनचालकांमध्ये पसरताच रिक्षाचालकांनी सीएनजी पंपावर धाव घेतली. कल्याण शहरातील इतर पंप बंद झाल्याने त्यांनी कल्याणमधील दुर्गाडी चौकात लांबच लांब राग लागल्याचे पाहायला मिळाले. यावेळी चालकांनी तीन दिवस महानगर गॅसचा पुरवठा बंद असल्याची माहिती मिळाल्याने पंपावर आल्याचे सांगितले. मात्र गॅस पुरवठा का बंद राहणार, याबाबत माहीत नसल्याचे सांगितले. तसेच तीन दिवस गॅस पुरवठा बंद असणार असेल, तर आम्ही व्यवसाय कसा करायचा, असा सवाल रिक्षा चालकांनी उपस्थित केला.

मुंबईत सीएनजी दरात कपात

वाहनचालकांना दिलासा देणारी बातमी हाती आली. महानगर गॅस लिमिटेड मुंबईत सीएनजीच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी मध्यरात्रीपासून सीएनजीचे दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. महानगर गॅस लिमिटेडने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

महानगर गॅस लिमिटेडनं दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत सीएनजीच्या दरात प्रतिकिलो २.५० रुपयांची कपात करण्यात आली आहे. यामुळे वाहनचालकांना आता एका किलो सीएनजीसाठी ७३.४० रुपये मोजावे लागणार आहेत. तर सीएनजीच्या दर कपातीच्या निर्णयाचं मुंबईकरांकडून स्वागत करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Exit Poll: सोलापूर दक्षिण मतदारसंघातून कोण होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

Buldhana Vidhan Sabha : महायुतीच्या उमेदवारांकडून धमक्या; मविआकडून पोलिसात तक्रार, सुरक्षा देण्याची मागणी

Saam Exit Poll : अजित पवार की शरद पवार, चिपळूणमध्ये कौल कुणाला? एक्झिट पोल कुणाच्या बाजूने? VIDEO

Pune Cantonment Exit Poll : पुणे कॅन्टोनमेंटमध्ये रमेश बागवे आमदार होणार? पाहा Exit Poll

World Travel : स्वित्झर्लंडपेक्षा लय भारी भारतातील 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT