Kalyan Breaking News  Saam TV
मुंबई/पुणे

Kalyan News : गरबा बघण्यासाठी ट्रान्सफार्मरच्या भिंतीवर चढला; विजेचा शॉक लागून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

Kalyan Breaking News : कमलकाकर खंडू नवाळे (वय १५) असं मृत मुलाचे नाव असून तो इयत्ता दहावीत शिक्षण घेत होता.

Satish Daud

अभिजित देशमुख, साम टीव्ही

गरबा बघण्यासाठी १५ वर्षीय अल्पवयीन मुलगा ट्रान्सफार्मरच्या भिंतीवर चढला. मात्र, खाली उतरत असताना तोल गेल्याने विद्युत त्याचा तारांना स्पर्ष झाला. त्यामुळे त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. या घटनेत मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला. मन सुन्न करणारी ही घटना कल्याणच्या खडकपाडा परिसरात मंगळवारी (ता. ८) रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे.

कमलकाकर खंडू नवाळे (वय १५) असं मृत मुलाचे नाव असून तो इयत्ता दहावीत शिक्षण घेत होता. मिळालेल्या माहितीनुसार, नवरात्री उत्सवानिमित्त कल्याणच्या खडकपाडा परिसरात गरबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच परिसरात राहणारा कमलाकर नवाले हा गरबा पाहण्यासाठी गेला होता.

दरम्यान, गर्दी असल्याने तो कमलाकर हा रस्त्यालगत असलेल्या ट्रान्सफार्मरच्या भिंतीवर चढला. परिसरातील लोकांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी तातडीने कमलाकरला खाली उतरण्यास सांगितले. मात्र, भिंतीवरून खाली उतरत असताना त्याचा तोल गेला.

ट्रान्सफार्मरच्या वायरला कमलाकरचा हात लागल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. काही क्षणातच कमलाकर हा भिंतीवरून खाली पडला. स्थानिकांनी त्याला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात जाण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे खडकपाडा परिसरात शोककळा पसरली आहे.

पुण्यात गरबा खेळताना हार्ट अटॅकने मृत्यू

गरबा डान्स करत असताना एका सुप्रसिद्ध गरबा डान्सरचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील राजगुरुनगर परिसरात घडली. अशोक माळी, असं मृत्युमुखी पडलेल्या गबरा डान्सरचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक माळी हे गरबा कसा खेळला जावा यासाठी अशोक हे चिमुकल्या मुलांना प्रशिक्षण देत होते. गरबा खेळत असताना अशोक माळी यांना अचानक हृदय विकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मतचोरीच्या खोट्या आरोपांना निवडणूक आयोग घाबरत नाही',: मुख्य निवडणूक आयुक्त

Vaishno Devi Yatra: वैष्णो देवीची यात्रा पूर्णपणे थांबवली, भाविकांना परत जाण्याचे आवाहन; नेमकं कारण काय?

Maharashtra Live News Update: पेशवे जयंतीनिमित्त रॅली मध्ये सहभाग घेत खासदार मेधा कुलकर्णी यांनी चालवली दुचाकी

Priya Bapat: प्रिया बापटचा स्पेशल बॉसी लूक; लवकरच झळकणार नव्या भूमिका

Asia Cup 2025 : आशिया कपसाठी पाकिस्तानी संघाची घोषणा, PCB चा बाबर आझम-मोहम्मद रिझवानला धक्का

SCROLL FOR NEXT