kalyan crime in bjp office  saam tv
मुंबई/पुणे

Kalyan Crime News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला वाचवा, भाजप कार्यकर्त्याची हाक

Kalyan Crime News: कल्याणमध्ये भरदिवसा आज्ञातांनी भाजपा कार्यालयामध्ये घुसून कार्यकर्त्याला धमकावले. या धमकीनंतर घाबरलेल्या कार्यकर्त्याने थेट मुख्यमंत्री फडणवीसांना मदतीची हाक दिली.

Saam Tv

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

कल्याण: कल्याण येथे कृष्णा उर्फ सोनू कारभारी यांच्या भाजप कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड करून कार्यालयात घुसखोरीचा प्रयत्न झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून या प्रकरणी कारभारी यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली परिसरात भाजपचे पदाधिकारी कृष्णा उर्फ साेनू कारभारी यांच्या मालकीची 27 गुंठे जागा आहे. याच जागेत कृष्णा यांचे भाजपचे जनसंपर्क कार्यालय आहे. आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास काहीजन कार्यालयात आले. त्यांनी भाजप कार्यालयात घुसताच तोडफोड सुरू केली आणि कार्यालयात असलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे देखील त्यांनी तोडून फेकून दिली. कृष्णा यांच्या जागेत जबदरस्तीने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आणि कृष्णा यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर कृष्णा यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन शैलैश जैन आणि रितेश किमतानी यांच्यासह २५ पेक्षा अधिक जणांवर त्यांच्या कार्यालयाची तोडफोड करून त्यांच्या जागेत घुसखोरी केली. त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याबाबत तक्रार दाखल केली. या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरदिवसा भाजपच्या पदाधिकाऱ्याचे कार्यालय फोडत धमकी दिल्याची घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे .या प्रकरणी तोडफोड करत घुसखोरी करुन जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला वाचवा,

या घटनेनंतर कृष्णा कारभारी यांनी आपला जीव आणि मालमत्ता धोक्यात असल्याचे सांगितले आहे. बिल्डर लॉबी आपल्याला त्रास देत असून, जीव वाचवावा अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या स्थानिक पदधिकाऱ्यांनी केली आहे.

दिवसाढवळ्या भाजप पदाधिकाऱ्याच्या कार्यालयावर हल्ला होऊन धमकी मिळाल्याने कल्याण शहरात मोठी खळबळ उडाली आहे. जर सत्ताधारी पक्षाचे नेतेच सुरक्षित नसतील, त्यांच्यावर इतके मोठे प्राणघातक हल्ले होत असतील, तर सामान्य माणसाचे काय? असा सवाल स्थानिक लोकांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भीषण ! डीएसपी रँकच्या २ पोलीस अधिकाऱ्यांच्या अपघातात मृत्यू

Rule Change: LPG गॅस, UPI ते क्रेडिट कार्ड...; १ ऑगस्टपासून ६ नियमांत होणार मोठे बदल

Viral Video : दबक्या पावलांनी आला पण, शिकारी हातातून सटकला; बिबट्याच्या शिकारीचा थरार कॅमेऱ्यात कैद

High Heel Side Effects: सतत हिल सॅन्डल्स घातलताय, होऊ शकतात या समस्या

Kala Vatana Usal: पावसाळ्यात बनवा झणझणीत काळ्या वाटाण्याची उसळ, चव वाढवण्यासाठी वापरा 'ही' खास ट्रिक

SCROLL FOR NEXT