Kalyan APMC Market  Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan APMC Market : कल्याणमध्ये घोटाळ्याचा बाजार; समितीत आजी-माजी संचालकांच्या नातेवाईकांचा भरणा

Kalyan APMC Market scam : कल्याणमध्ये कृषी बाजार समितीत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या समितीत आजी-माजी संचालकांच्या नातेवाईकांचा भरणा केल्यााच आरोप होत आहे.

Vishal Gangurde

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत ३७ जणांची भरती करताना नातेवाईकांची निवड

माजी नगरसेवक मयूर पाटील आणि अन्य याचिकाकर्त्यांकडून तीन स्वतंत्र याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल

याचिकांमध्ये भरती रद्द करण्याची, फौजदारी चौकशी आणि विशेष लेखापरीक्षणाची मागणी करण्यात आली आहे

या प्रकरणावर उच्च न्यायालयात २४ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचा कार्यकाळ संपल्यानंतर वाढीव कार्यकाळ मिळालेल्या समितीने एप्रिल-मे महिन्यात तब्बल ३७ जणांची सरळ सेवा भरती केली. मात्र, या भरतीत आजी-माजी संचालक, सभापती, सचिव यांच्या नातेवाईकांची निवड करण्यात आली, असा गंभीर आरोप होत आहे. माजी नगरसेवक आणि एपीएमसी संचालक मंडळाचे सदस्य मयूर सुरेश पाटील यांनी अनुज शिवाजी गोंधळेसह मुंबई उच्च न्यायालयात तीन स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत.

याचिकेत स्पष्ट पुराव्यांसह अनेक नावे नमूद करण्यात आले आहेत. यात वरिष्ठ लिपिकाचा नातेवाईक असूनही पात्रतेशिवाय निवड केल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर संचालक शंकरराव आव्हाड यांचा पुतण्या राजकीय दबावाखाली निवडला गेला. विद्यमान संचालकांचा मुलगा दनेश धुमाळ याची नियोजित नियुक्ती भाची, सून, मुलगी आणि थेट नातेवाईकांची निवड कोणतीही शासकीय पडताळणी न करता केल्याचा आरोप होत आहे.

वारसाहक्कावर आधारित निवड प्रक्रियेत अन्य उमेदवारांवर अन्याय असल्याचे सांगत याचिकाकर्त्यांनी न्यायालयाकडे मागणी केली आहे. या भरती प्रक्रिया अवैध घोषित करून रद्द करण्यात यावी जबाबदार पदाधिकाऱ्यांवर फौजदारी चौकशी आणि विशेष लेखापरीक्षण व्हावे अशीही मागणी यात केली आहे.

भविष्यातील भरती पारदर्शक व्हावी, या प्रकरणाची ACB आणि कृषी विपणन संचालकांनी तातडीने चौकशी सुरू करावी.सार्वजनिक विश्वास पुनर्संचयित करण्यासाठी समितीवर देखरेख वाढवावी अशी देखील या याचिकेत मागणी करण्यात आली आहे. या याचिकेनंतर या घोटाळ्यामुळे पात्र उमेदवारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आता सर्वांचे लक्ष २४ सप्टेंबर रोजीच्या उच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : नांदेडच्या तरूणाचा दुबईत दुर्दैवी मृत्यू, मुलाचा मृतदेह पाहून आई-बाप ढसाढसा रडले

Maharashtra Live News Update: आसनगाव येथील एस के आय कंपनीला भीषण आग

Crime News : १५ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, ४८ वर्षाच्या यूट्यूबरला अटक

Tadoba Safari: ताडोबा ट्रिप प्लॅन करताय? मग 'या' १० गोष्टी आधी वाचाच

Jio Recharge Plan: ३०० जीबी डेटा मिळणारा दमदार जिओ पोस्टपेड प्लॅन, Netflix आणि Prime सह सर्वोत्तम सुविधा

SCROLL FOR NEXT