Kalyan highway accident news : कल्याण अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात झाला असून ८ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. इको कार आणि मिक्सरची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. अपघातामधील जखमींना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळावर स्थानिकांच्या मदतीने तात्काळ बचावकार्य सुरू केले आहे. (8 Killed in Horrific Head-On Collision Between Eeco Car and Cement Mixer on Kalyan-Ahilyanagar Highway)
पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने तात्काळ बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे. जखमींनी उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर ८ जणांचे मृतदेह सरकारी रूग्णालयात पोस्टार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. अपघात नेमका का झाला? अपघातामधील मृताची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून केले जात आहे.
इको कार आणि सिमेंट मिस्करची समोरासमोर भयंकर धडक झाली होती. या भीषण अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला आहे. या अपघातामध्ये ८ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहेत. रायची पूलावर नव्याने उभारलेल्या ब्रिजवर सिमेंट मिस्कर आणि काळीपिवळी इको कारची जोरात धडक झाली. इको कारने सिमेंट मिस्करला जोरात धडक दिली. इको कार ही कल्याण ते मुरबाड अशी प्रवासी वाहतूक करत असते. त्याचवेळी थोड्यावेळापूरवी इको कारने मिस्करला समोर धडक दिली. टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ८ जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही.
स्थानिक प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार इको कारमधून ८ मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर एक प्रवासी यामध्ये जखमी झालेला आहे. त्याला उपचारासाठी जवळच्या खासगी रूग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या भीषण अपघातामधील मृत कुठले आहेत? त्यांची नावे काय आहेत? याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. टिटवाळा पोलिसांनी तात्काळ अपघातग्रस्त वाहन बाजूला केले. वाहतूक सध्या सुरळीत कऱण्यात आलेली आहे. पोलिसांकडून घटनास्थळावर पंचनामा कऱण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.