Kalyan Accident News
Kalyan Accident News Saam TV
मुंबई/पुणे

Kalyan Accident News : काळीज पिळवटून टाकणारी घटना; इमारतीसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

Crime News : कल्याण पूर्व परिसरातून एक मोठी दुर्दौवी घटना समोर आली आहे. येथे इमारतीसाठी खोदलेल्या खड्ड्यात १२ वर्षीय मुलागा पडून त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोकाकुल वातावरण पसरलं आहे. (Latest Accident News)

मिळालेल्या माहितीनुसार, रियान शेख असे मृत मुलाचे नाव आहे. कल्याण पूर्व परिसरात इमारतीसाठी एक खड्डा खोदण्यात आला होता. हा खड्डा खोल असल्याने त्यात पाणी साचले होते. रियान खेळताना त्याला हा खड्डा दिसला नाही. त्यामुळे खेळताना तो या खड्ड्यात पडला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून मुलाला शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र सर्व प्रयत्न अपयशी ठरले आणि त्या लहान मुलाचा दुर्दौवी मृत्यू झाला.

घरातून खेळण्यासाठी घरातून बाहेर पडताना आपल्यासोबत असे काही होईल याची त्याला मुळीच कल्पना नव्हती. रियानच्या आईला आपला मुलगा गेल्याने शोक अनावर झाला आहे. मुलासाठी पाहिलेली सर्व स्वप्न क्षणात मातीमोल झाली आहेत.

गेल्या २४ तासात कल्याणमध्ये (Kalyan) दोन मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या एका फुलाच्या दुकानाला आग लागल्याची घटना आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. दुकानाचे शटर बंद करून एक कामगार दुकानात झोपला होता. शटर बंद असल्याने त्याला दुकानाच्या बाहेर निघता आले नाही. त्यामुळे आगीत होरपळून त्याचा मृत्यू झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Breaking News : १२ आणि १७ मे रोजी राज ठाकरे, नरेंद्र मोदी एकाच मंचावर, बाळा नांदगावकर यांची माहिती

LokSabha Election: सांगोल्यात EVM जाळलं; एकजण पोलिसांच्या ताब्यात

Kushal Badrike : “सहप्रवासी बदलत राहतात, “प्रवास” मात्र कायम असतो...”; कुशल बद्रिके आयुष्याबद्दल खूप काही बोलून गेला, पोस्ट चर्चेत

Rohit Pawar Tweet | मतदानात भेसळ, मतदारांना पैसे वाटतानाचा Video रोहित पवारांकडून ट्वीट

Hapus Mango : खरा हापूस आंबा कसा ओळखायचा?

SCROLL FOR NEXT