Ruchika Jadhav
सध्या बाजारात विविध प्रकराचे आंबे विक्रीसाठी आले आहेत.
यामध्ये देवगडचा हापूस आणि दक्षिण भारतातला हापूस आंबा कसा ओळखावा हे अनेकांना संमजत नाही.
देवगडचा हापूस देठाच्या बाजूला गोल असतो तर दक्षिण भारतातला हापूस देठाकडे चपटा असतो.
दक्षिण भारतातला हापूस आंबा चवीला आंबट असतो. तर देवगडचा हापूस मधासारखा गोड लागतो.
देवगड हापूस आंबा फक्त लाकडी पेटीमध्ये विकला जातो. दक्षिण भारतातला हापूस आंबा कागदी पेटीत विकतात.
बाजारात देवगड आंब्याला जास्त मागणी आहे. मात्र व्यावसायिकांकडून ग्राहकांची अनेकदा फसवणूक केली जाते.
निवृत्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सिंधुदुर्ग श्री बागल यांनी साम टीव्हीला याबाबत माहिती दिली आहे.
त्यामुळे या निकषांच्या आधारे तुम्ही योग्या हापूस आंबा खरेदी करून खाऊ शकता.