chhatrapati shivaji maharaj hospital  Saam Tv
मुंबई/पुणे

Kalwa Hospital News: धक्कादायक! ठाणे मनपा रुग्णालयात एका रात्रीत १७ रुग्णांचा मृत्यू, नातेवाईकांचा आक्रोश

Chhatrapati Shivaji Maharaj Hospital News: काही दिवसांपूर्वीच या रुग्णालयामध्ये एकाच दिवशी ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

Priya More

Thane News: ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात (Chhatrapati Shivaji Maharaj Hospital) मोठी दुर्घटना घडली आहे. या रुग्णालयामध्ये एकाच रात्रीमध्ये उपचार सुरु असलेल्या १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या रुग्णालयातील अंदोगोंदी कारभार वारंवार समोर येत आहे.

काही दिवसांपूर्वीच या रुग्णालयामध्ये एकाच दिवशी ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या रुग्णांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा सवाल संतप्त नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे सध्या ठाण्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये गेल्या दोन दिवसांपासून रुग्णांचा मृत्यू होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशामध्ये एका रात्रीत या रुग्णालयामध्ये १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यामुळे खळबळ उडाली. या रुग्णालयामध्ये आयसीयूमध्ये उपचार सुरु असलेल्या १४ रुग्णांचा आणि जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरु असलेल्या ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी या रुग्णालयात उपचार न मिळाल्याने ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला होता. त्यातच आता आणखी १७ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी आक्रोश केला आहे. रुग्णांना तपसण्यासाठी डॉक्टर येत नसून त्यांना वेळेवर औषध दिले जात नसल्याचा आरोप मृत रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.

शुक्रवारी रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हड यांनी रुग्णालयात धाव घेत प्रासनाला धारेवर धरत संताप व्यक्त केला होता. यावेळी जितेंद्र आव्हाडांसमोर नातेवाईकांनी एकच आक्रोश करत सर्व घटनाक्रम सांगितला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सलग तिसऱ्या दिवशी अमरावती ठरलं देशातील सर्वाधिक उष्ण शहर

jio 365 days Plan: वर्षभर रिचार्जची गरज नाही! Jioचा 365 दिवसांचा धमाकेदार प्लॅन; 2.5GB डेटा, किमंत फक्त...

Pune : पुण्यातील सरकारी हॉस्टेलमध्ये दूषित पाणी, २० विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली

Diabetes Symptoms: पायांमध्ये होणारे हे बदल देतात मधुमेहाचे संकेत; सामान्य लक्षणं समजून दुर्लक्ष करू नका

Gold Rate Today: चांदी ५ हजारांनी घसरली, तर सोन्याचे दरही झाले स्वस्त, वाचा सुवर्णनगरीतील ताजे दर

SCROLL FOR NEXT