KALYAN KALA TALAO FISH DEATHS CREATE PANIC AMONG CITIZENS Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan : कल्याणच्या काळा तलावात मृत मास्यांचा खच; नेमकं कारण आलं समोर

Kalyan News : कल्याणच्या प्रसिद्ध काळा तलावात मोठ्या प्रमाणावर मासे मृत अवस्थेत आढळल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. प्रदूषण आणि वाढत्या उष्णतेमुळे ही घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Alisha Khedekar

  • कल्याणच्या काळा तलावात मोठ्या प्रमाणावर मासे मृत अवस्थेत आढळले

  • तलाव परिसरात तीव्र दुर्गंधी पसरल्याने नागरिक त्रस्त

  • वाढते तापमान आणि प्रदूषण हे माशांच्या मृत्यूमागचे प्रमुख कारण

  • केडीएमसीकडे तक्रार

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याण शहरातील प्रसिद्ध काळा तलाव परिसरात मोठ्या प्रमाणावर मासे मृत अवस्थेत आढळून आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तलावाच्या पाण्यावर आणि किनाऱ्यावर शेकडो मासे मृत अवस्थेत तरंगताना दिसत असून परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी, व्यायामासाठी आणि ताजी हवा घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

काळा तलाव हा कल्याण शहरातील नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र मानला जातो. दररोज मोठ्या संख्येने नागरिक येथे चालण्यासाठी, व्यायामासाठी येत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तलाव परिसरात दुर्गंधी वाढल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. आज सकाळी अनेक नागरिक फिरण्यासाठी तलाव परिसरात आले असता तलावाच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात मृत मासे तरंगताना दिसून आले. हा प्रकार पाहून नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.सध्या वाढत्या उष्णतेमुळे तलावातील पाण्याचे तापमान झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते आणि माशांना श्वास घेण्यास अडचण निर्माण होते. परिणामी मोठ्या प्रमाणावर मासे मृत होत असल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे.

तसेच तलावातील प्रदूषण आणि साचलेला गाळ याचाही परिणाम माशांच्या मृत्यूवर होत असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. काळा तलावाचे सुपरवायझर अनिल सोनवणे यांनी सांगितले की, या घटनेची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केडीएमसी प्रशासनाला देण्यात आली आहे. दुर्गंधी कमी करण्यासाठी आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी दररोज तलावातून मृत मासे बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. दररोज सुमारे ६० ते ७० किलो मृत मासे काढले जात असूनही दुर्गंधी कायम असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, नागरिकांनी केडीएमसी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. तलावातील पाण्याची तपासणी करून प्रदूषण रोखण्यासाठी आणि जलचरांचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'रेड अलर्ट' दिल्यानंतर कुठे जाऊ नये? धोक्याची ठिकाणे कोणती?

Satara News: सातारा हादरले! विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, क्षणात सर्वकाही संपलं

Maharashtra News Live Update: नेरळ-भिवपुरीदरम्यान पाणी साचल्याने अनेक मेल-एक्सप्रेस गाड्यांचा मार्ग बदलला

Ahilyanagar Waterfall : धो धो कोसळणारा धबधबा अन् सह्याद्रीच्या सौंदर्याचा सुंदर संगम, अहिल्यानगरमध्ये लपलंय 'हे' ठिकाण

School Holiday: शाळा- महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, पालघर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT