MIM Corporator Sahar Sheikh Wankhede Saam TV Marathi News
मुंबई/पुणे

Sahar Sheikh : कैसे हराया... नॉट रिचेबल सहर शेख चक्क वानखेडे स्टेडियमवर, व्हिडिओ पोस्ट करत म्हणाल्या...

Sahar Sheikh fake caste certificate : बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात अडचणीत असलेल्या सहर शेख ‘नॉट रिचेबल’ असताना वानखेडे स्टेडियमवर दिसल्या. त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Namdeo Kumbhar

MIM Corporator Sahar Sheikh Wankhede : कैसे हराया म्हणत विरोधकांना डिवचणाऱ्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख (Sahar Sheikh latest news) आणि त्यांचे वडील युनूस शेख सध्या 'बनावट जात प्रमाणपत्रा'मुळे कायदेशीर कचाट्यात सापडले आहेत. मागील २४ तासांपासून सहर शेख 'नॉट रिचेबल' होत्या. पण सहर शेख आयपीएलच्या सामन्यावेळी दिसल्या आहेत. 'बनावट जात प्रमाणपत्र' प्रकरणात सहर शेख यांचे नगरसेवक पद धोक्यात आले. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची जोरदार चर्चा झाली. पण मुंबई (Mumbai Indians) आणि पंजाब यांच्यात वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात सहर शेख उपस्थित होत्या. (Sahar Sheikh Wankhede stadium video controversy)

सहर शेख यांनी इन्स्टाग्रामवर स्टेडियमच्या गॅलरीतील व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यांनी व्हिडिओ पोस्ट करताना गेम ओव्हर.. असे टेक्स्ट टाकलेय. त्याशिवाय एका गाणं त्यांनी पोस्ट केलेय. ते सध्याच्या त्यांच्या परिस्थितीवर भाष्य करत असल्याचे दिसतेय. त्यांनी.." तूने ना जाना तेरे जाने से क्या क्या हुआ कितनी कहानी बनी कितना तमाशा हुआ..जाने तू कैसी होगी.. हे गोणं पोस्ट केले आहे. त्यानंतर पुन्हा एकदा सहर शेख यांची चर्चा सुरू झाली. सहर शेख याने तेरे जाने से क्या क्या हुआ असे म्हणत सगळ्यांना पुन्हा डिवचल्याचे बोलले जात आहे.

बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाचा तपास सुरू झाल्यानंतर सहर शेख नॉट रिचेबल होत्या. सर्वांच्या नजरेआड गेलेल्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांचे दर्शन अखेर मुंबईत वानखेडे स्टेडियमवर घडले. पोलिसांपासून दूर असलेल्या शेख यांना क्रिकेटची ओढ मात्र आवरता आली नाही. त्या वानखेडेवर मुंबई इंडियन्सला चीअर करताना दिसून आल्या. 'बनावट जात प्रमाणपत्रा'चा अहवाल समोर आल्यानंतर त्या बेपत्ता होत्या, मात्र वानखेडेच्या गॅलरीतील उपस्थित होत्या. दरम्यान, वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या पंजाबने मुंबईचा सात विकेटने दारूण पराभव केला.(Mumbai Indians vs Punjab match result)

बोगस जात प्रमाणपत्र सादर करून निवडणूक लढवल्याची सहर शेख यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली होती. यूपीचे रहिवासी असूनही महाराष्ट्राचा ओबीसी दाखला मिळवल्याचा प्राथमिक आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. स्थलांतरितांसाठी नमुना 10 आवश्यक असताना नमुना 8 वापरून प्रशासनाची फसवणूकीचा आरोपही करण्यात आला आहे. ठाणे तहसीलदारांकडून प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांमधील अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. फसवणूक सिद्ध झाल्यास सहर शेख यांचं नगरसेवक पद रद्द होऊन गुन्हा दाखल होऊ शकतो.

दरम्यान ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जात पडताळणी विभागाकडून या प्रकरणाचा अहवाल लवकरच प्राप्त होणार आहे. जर जात पडताळणी समितीने युनूस शेख यांचे प्रमाणपत्र अवैध ठरवले, तर सहर शेख यांचे नगरसेवकपद धोक्यात येऊ शकतं. त्याशिवाय त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. ठाणे महानगरपालिकेत सध्या MIM चे ५ नगरसेवक आहेत. जर सहर शेख यांचे पद रद्द झाले, तर ही संख्या चारवर येईल, जो पक्षासाठी मोठा धक्का मानला जातेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अकोल्यात 13 लाख 80 हजार किमतीचं ड्रग्ज'चं जप्त

Pathology Scam: पॅथोलॉजीत रुग्णांच्या लुटीची 'टेस्ट', लॅबच्या लुटीचा 'साम'वर भांडाफोड; पाहा VIDEO

बोक्यानं साधला मोका अन् मांजरी संग भिडवला टाका, पिल्लांच्या मालकीवरून राडा, पाहा नेमकं झालं काय?

नराधमांना मोक्का लावा, अन्यथा तीव्र आंदोलन! काँग्रेस नेत्याचा पोलीस प्रशासनाला इशारा

बोगस दाखला सहर बेपत्ता; नगरसेविका सहर शेख नॉट रिचेबल, Video

SCROLL FOR NEXT