Kabutar News Saam Tv
मुंबई/पुणे

Kabutarkhana: मुंबईत चार ठिकाणी तब्बल १०००० कबुतरे; इमारतीचं नुकसान, आरोग्यावर परिणाम, अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर

Kabutar Effect on Buildings And Health: कबुतरांच्या विष्ठेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असं एका अभ्यासातून समोर आलं आहे. यामुळे इमारतींवरदेखील रासायनिक परिणाम होतो.

Siddhi Hande

मुंबईतील कबुतरखान्यावरुन वाद सुरु आहे. दादरमधील कबुतरखाना हटवण्यात आला आहे. त्यामुळे अनेक नागरिक आक्रमक झाले आहेत. दरम्यान, सर्वाधिक कबुतरखाने हे मुंबईत आहे. मुंबईत तब्बल ३,५०० कबुतरे ही एकाच ठिकाणी असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. दरम्यान, या कबुतरांमुळे नागरिकांच्या आरोग्यास आणि इमारतींवर रासायनिक परिणाम होत आहे.

कबुतरांमुळे सार्वजनिक आरोग्यास आणि वास्तूच्या संरक्षणास मोठा धोका निर्माण झाला आहे. भारतीय निसर्ग इतिहास संस्था आणि कॉमन बर्ड मॉनिटरिंग प्रोग्रामअंतर्गत कबुतरांवर अभ्यास केला होता. २०१७ पासून हा अभ्यास करण्यात आला होता.

दादरमध्ये ३५०० कबुतरे

या अभ्यासात मुंबईत एकाच ठिकाणी ३५०० पेक्षा जास्त कबुतरे असल्याचे समोर आले. मुंबईत दादर येथे ३५०० कबुतरे आहे. गेट वे ऑफ इंडिया येथे ३००० कबुतरे, सीएसएमटी येथे १,५०० रुपये तर गिरगाव चौपाटी १,१६६ कबुतरे आहेत.या ठिकाणी कबुतरांना नियमित अन्न आणि पाण्याची सोय असते.

इमारतींचे नुकसान

कबुतरांनी बदलते वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेतले आहे. एक कबुतर दरवर्षी १२ किलो विष्ठा करते. ही विष्ठा बुरशीजन्य आणि जंतुसंसर्ग पसरवण्यास पोषक ठरते. यामुळे संगमरवरी आणि चुन्याच्या इमारतीवर परिणाम होत आहे. यामुळे दगडी इमारती आणि स्मारकांचे नुकसान होते.

कबुतरांमुळे आजार पसरतात

कबुतरांमुळे मोठी आणि पक्की बांधकामेदेखील खराब होत असल्याचे समोर आल आहे. कबुतरांमुळे जंतुसंसर्ग पसरत आहे. यामुळे गंभीर आजारदेखील होत असल्याचे समोर आले आहे. कबुतरांमुळे श्वसनविकार, त्वचारोग, अॅलर्जी, बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतात. याचसोबत कबुतरांच्या विष्ठेमुळे डिस्टोप्लाझ्मा,क्लॅमायडोफिला हे रोगजनक सूक्ष्मजीव परसतात. यामुळे बर्ड फॅन्सियर्स लंग नावाचा आजार होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Officers Promotion: राज्यात १५० पेक्षा अधिक पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश; वाचा संपूर्ण लिस्ट

Bogus Voter Scam: राहुल गांधींकडून पुराव्यांसह बोगस मतदारांचा भांडाफोड; सांगितली नोंदणीची मोडस ऑपरेंडी

Vantara:'माधुरी'नंतर वनताराचा 'गौरी'वर डोळा? गौरी हत्तीणीसाठी 3 कोटींची ऑफर?

Shocking : महाराष्ट्र हादरला! ७ वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून अत्याचार, पालकांमध्ये संताप

Kharadi Rave Party: जावई खेवलकरांच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ फोल्डर, चाकणकरांच्या आरोपांनंतर सासरे खडसेंचा पारा चढला

SCROLL FOR NEXT